Sunday, 26 September 2021

Happy daughter's day



 

Happy daughter's day



 

Tourism


 

Election? selection

 नेहरूंचे लोकशाहीवरील अजब प्रेम. प्रसाद क्षीरसागर यांची पोस्ट


*नेहरूंच्या काळातील व नेहरूंच्या आदेशाने घडलेली पहिली बुथ कॕप्चरिंगची कथा*


देशातील पहिली लोकसभा निवडणूक....लोकसभा मतदारसंघ रामपूर, उत्तरप्रदेश (आत्ता आजम खान व जयाप्रदा उभे आहेत तो मतदारसंघ..) *काँग्रेसकडून मौलाना अब्दुल कलाम आझाद उभे होते.*

*त्यांच्याविरोधात हिंदू महासभेचे विशनचंद सेठ उभे होते.* जवाहरलाल नेहरूंनी रामपूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण जोर लावला होता...कारण मौलानांचे व नेहरूंचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते..

मात्र, मतमोजणी झाल्यावर मौलाना अबूल कलाम आझाद साधारण ८००० मतांनी पडल्याचे  लाउडस्पीकरवरून जाहीर झाले. 

हिंदू महासभेच्या विशनचंद सेठ व त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला...जल्लोश सुरू होता...मिरवणूक निघाली..

इकडे रामपूर कलेक्टरकडून मौलान आझाद पडल्याची बातमी लखनौला व तिथून दिल्लीला पोचली. 

बातमी ऐकताच नेहरूंचे पित्त खवळले...

दिल्लीहून जवाहरलाल नेहरूंचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रींना (गोविंद वल्लभ पंत) फोन आला...जवाहरलाल म्हणाले,

"गोविंदजी आपको आज रात तक समय है...कुछ भी करीये..मौलाना जितने चाहिये..वर्ना इस्तेफा तैयार रखे..."

गोविंद पंतांचे धाबेच दणाणले...त्यांनी रामपूर कलेक्टरला फोन केला...काहीही करा...मौलाना विजयी झाले पाहिजेत...कलेक्टर म्हणाले..निकाल जाहीर केलाय..आता कसा बदलू...? ते तुमचे तुम्ही पाहा...मला संध्याकाळच्या आत मौलाना विजयी झाल्याचा फोन तुमच्याकडून आला पाहिजे...नाहीतर.....


कलेक्टरसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्याला शंभूनाथ टंडनला बोलावले व असतील तिथून विशनचंद सेठला इकडे घेऊन या असा आदेश दिला...

शंभुनाथ टंडन रामपूर कलेक्टर अॉफिसमधे सुचना विभाग पाहात होते...टंडन विशनचंद सेठ यांच्या विजय मिरवणूकीत गेले...व कलेक्टर साहेबांचा निरोप सांगितला...विशनचंद सेठ कलेक्टर अॉफिसमधे आले...कलेक्टरसाहेब म्हणाले," फेरमोजणीचा अर्ज आला आहे...तेव्हा परत एकदा मोजणी केल्यानंतर फायनल निकाल जाहीर होईल. विशनचंदांना आश्चर्य वाटले...तुम्हीच तर मोजणी केलीय...तुम्हीच निकाल जाहीर केला...आता म्हणता फेरमोजणी करायची...कसं शक्य आहे...? माझे कार्यकर्ते तिकडं माझ्या विजयाच्या मिरवणूकीत आहेत....बुथ प्रतिनिधीला बोलावून आणणे शक्य नाही...

कलेक्टरसाहेब म्हणाले...ते काही मला सांगू नका...आधीचा निकाल रद्द करतोय...व फेरमोजणीचा आदेश देतोय...


त्याकाळी मतदान कसं व्हायचे ते समजून घ्यावे...

सगळ्या उमेदवारांचा समान बॕलेट पेपर असायचा..बॕलेट पेपरवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर शिक्का मारायची पद्धती नव्हती....तर प्रत्येक उमेदवाराची वेगवेगळी मतपेटी असायची...म्हणजे मला काँग्रेसला मत द्यायचे आहे तर मी बॕलेट पेपर घेऊन फक्त काँग्रेसच्या मतपेटीत टाकायचे....झाले मतदान..


तर, आता कलेक्टरसाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या (शंभुनाथ टंडन व इतर) मदतीने काय केले....तर हिंदू महासभेच्या व काँग्रेसच्या मतपेट्या उघडल्या त्यातील बॕलेट पेपर एकत्रित सतरंजीवर टाकले....बिशनचंद यांनी आक्षेप घेतला....तेव्हा अत्यंत नम्रपणे विनवणीच्या स्वरात कलेक्टरसाहेब म्हणाले...दिल्लीवरून आदेश आहे....तुम्हाला हरावच लागेल.....आमचा नाइलाज आहे...आमच्या नोकरीचा प्रश्न आहे....जास्तीतजास्त बॕलेट पेपर काँग्रेसच्या मतपेट्यात भरले...व मतपेट्या परत सील केल्या...हे सगळे कृत्य बिशनचंद सेठ यांच्या समोरच केले गेले...बिशनचंद सेठ हतबल होते...


संध्याकाळी फेरमतदानानंतर काँग्रेस उमेदवार मौलाना अबूल कलाम आझाद २००० मतांनी जिंकल्याचे जाहीर केले.....!


देशातील पहिली बुथ कॕप्चरींग कथा समाप्त.




- प्रसाद राजन् क्षीरसागर


*संदर्भ- स्व. विशनचंद सेठ यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ नोव्हेंबर २००५ साली अटलजींच्या हस्ते प्रकाशीत* 

*'हिंदुत्व के पुरोधा' ग्रंथातील शंभुनाथ टंडन यांचा लेख...लेखाचे नाव,*

*"जब भईये विशन सेठ ने मौलाना आजाद को धूल चटाई थी, भारत के इतिहास की एक अनजान घटना")*


*म्हणजे हा लेखही कोणी लिहिला आहे तर तो शंभूनाथ टंडन यांनी म्हणजे या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या सरकारी अधिकार्‍याने.*

Kanyadan

 #कन्यादानच


गेले चार पाच दिवस समाज माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे.आलिया भट नामक सिनेअभिनेत्री ने एका जाहिरातीत कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा असा अनाहुत सल्ला हिंदुंना दिला.वरवर पाहता एखाद्याला वाटेल की कन्येचा मान करायला सांगतेय यात काही चुकीचं नाही.परंतु त्या आधी ती कन्यादाना ऐवजी हे करायला सांगतेय ते १००%चुकीचे आहे.कसे ते आपण नीट पाहिले पाहिजे.

सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत.दान हि देखील एक उदात्त संकल्पना आहे.सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे.योग्य काळी,योग्य वेळी एखादि जबाबदारी योग्य व्यक्ती कडे सुपूर्द करणे हे दानात अभिप्रेत आहे.दान हे निर्जीव वस्तुचे होते हा एक गोड गैरसमज आहे.शास्त्रानुसार गोप्रदान,महिषीदान,मेषदान, भूदान अशी अनेक सजीवांची दाने देखील सांगीतली आहेत.त्यामुळे हा मुद्दा आपसुकच बाजूला होतो.

दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.शास्त्रानुसार कौमार्य अवस्थेत कन्येच्या संरक्षणाची व पालनपोषणाची जबाबदारी पित्याची आहे.कन्येच्या तारुण्यात हि जबाबदारी भर्त्याची म्हणजे नवर्याची आहे (कारण जेव्हा कन्या तरुण होते तेव्हा वडिल वृध्दत्वाकडे झुकलेले असतात तेव्हा तरुण मुलीची जबाबदारी पतीकडे सुपूर्द केलेली असते)व वृध्दापकाळात त्या कन्येची जबाबदारी तिच्या मुलांची असते ( कारण तेव्हा तिचा पती देखील वृध्द झालेला असतो तिथे जबाबदारी मुलांकडे सुपूर्द होते). तारुण्यात शारीरिक व मानसिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य जोडीदार जो #कुलशीलाने_संपन्न व #दहा_दोषांनी_वर्जीत (अपस्मार,फेफरे येणारा,अतीशूर,षंढ,पतीत,दूरदेशी राहणारा,जुगारी वगैरे)असलेल्या सद्गुण संपन्न मुलाला कन्या संकल्प पूर्वक #धर्म_अर्थ_काम या तीन पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता देव ,अग्नि,द्विज, नातेवाईक यांच्या साक्षीने अटी सह सुपूर्द करणे म्हणजे कन्यादान होय.

आता हि अट कोणती?तर चार पुरुषार्थ शास्त्रानुसार सांगितले आहेत.धर्म‌,अर्थ,काम,मोक्ष हि त्यांची नावे आहेत.त्यामधील धर्म,अर्थ ,काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावे त्यात कोणताही अतिरेक करु नये हि अट आहे.धर्म(व्रत वैकल्ये,कुलाचार,धर्मकृत्ये),अर्थ(द्रव्याचा योग्य पध्दतीने कमावणं व विनियोग,बचत,अन्य तरतूद),काम(सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.

शिक्षणाकरता आपण मुलांना जेव्हा शाळेत पाठवतो तेव्हा शिक्षकांना सांगतो आजपासून हा विद्यार्थी तुम्हाला सुपुर्द केलाय तुम्ही याला चांगला विद्वान व सदाचारी बनवा तेव्हा आपण गुरुजींकडे  विद्यार्थ्याची जबाबदारी सुपूर्द च करतो.

तसंच योग्य काळी योग्य जोडीदारास कन्येची जबाबदारी देणे यात काही गैर‌ नाही.

अनेक लोकांचा आक्षेप असतो की कन्यादान करताना मुलीच्या हातावर पाणी सोडतात आम्ही आमच्या मुलीवर पाणी सोडणार नाही.मुळात संकल्प करताना पाणी हे कर्मसाक्षी देवता असल्याने हातात उदक घेवुनच संकल्प करावा लागतो.एखादा श्रीमंत सांगेल की संकल्पास पाणीच का? मी दुध/दहि/मध/तूप हातावरुन सोडुन संकल्प करेन त्यात काय ?तर यांचे उत्तर आहे या पदार्थांनी संकल्प सोडला असता तर या पदार्थांचा लेश/लेप हातावर राहतो त्याचा चिकटपणा हातावर राहतो तो त्या कर्मास बाधक ठरतो लेशरहित /निर्लेप कर्म करावे हा शास्त्राचा दंडक आहे त्यामुळे  तिथे संकल्पाचे उदक सोडताना शब्दशः अर्थ घेवुन गोंधळ करु नये.नरपुंगव हि संस्कृत मधे एक पदवी आहे.याचा शब्दशः मराठी अर्थ बैल असा घेतला तर मग गोंधळ होतो.हाणामारी पण होवु शकते.

त्यामुळे संकल्पनांचे शब्दशः अर्थ न काढता त्यातली अर्थपूर्णता ,गांभीर्यता व त्यातले मर्म समजवून घेणे महत्वाचे आहे.

आज हि नटी सांगतेय म्हणुन किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून ऋषी मुनींना चुक ठरवु नका.कन्या महत्वाची आहे म्हणुनच तिची जबाबदारी घ्यायला सांगितली आहे.

आज कन्यादान बंद करा म्हणुन सांगतील मग कालांतराने विधी ऐवजी कबुल है ,कबुल है हेच योग्य आहे अस सांगतील.

आपण कन्यादानावरच मात्र ठाम रहा.दोन्ही बाजुच्या१२ -१२

पिढ्यांचा उद्धार कन्यादानाने होतो एवढे पुण्यकारक हे कर्म आहे.तेव्हा कन्यादान च

कन्यादान कधी होत? जेव्हा दोन्ही पक्षांच्या सहमतीने विवाह होतो तेव्हा.पण परधर्मीयानी मुलीला पळवुन नेली तर कन्यादान होत नसत. कन्यादान नको कन्यामान करा हा द्रविडी प्राणायाम या करता नसेल कशावरून?निकाह व चर्च ,कोर्टमॅरेज मधे कन्यादान नसतं हेच कन्येच्या मनावर अप्रत्यक्ष बिंबवण्याचा हा खटाटोप तर नसेल ना?

सावध तो सुखी हे लक्षात ठेवा

©️ भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

 रक्तदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

 

            मुंबई, दि.26:- राज्यातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे . स्वयंसेवी संस्थाशासकीय यंत्रणेतील सर्व घटकजिल्हाधिकारीमुख्याधिकारीतहसीलदारसिव्हील सर्जन यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेवून नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत असेही श्री.शिंगणे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

             डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणालेराजकीय पदधिकारी यांनी राजकीय नेत्यांचे वाढदिवस तसेच थोर व्यक्तींच्या जयंतीपुण्यतिथी आणि इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. थॅलसेमियाकॅन्सर रुग्णांसाठी नियमित रक्ताची गरज भासते. यास्तव या रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.

             राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्य आराखडा तयार करुन सर्व प्रयत्न करावेत असे डॉ. शिंगणे यांनी निर्देश दिले आहेत.  रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावेत असे रक्तपेढयांना आवाहन केले आहे.

000

 

 

 

 

 


Hajare think


 

Featured post

Lakshvedhi