Saturday, 25 September 2021

 चंद्रपूर येथील वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे

                                             - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई दि.24 :  चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी अर्थात वन अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चंद्रपूर वन अकादमीच्या विस्तार आणि विकासासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) जी.साईप्रकाश,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी   अजय गुल्हाने व वन विभागाचे अन्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

स्वतंत्र संचालक पद

       वन अकादमीला स्वायत्त संस्था म्हणून विकसित करण्यासाठी संचालक पदावर स्वतंत्र व्यक्तीची  तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. तसेच संस्थेत वन अधिकारी प्रशिक्षणासोबतच वनवन्यजीवपर्यावरण व वातावरण बदल या आधारित पदविका ते पदव्युत्तर अभ्यासक्रम आयोजित करावेत असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

वन विद्यापीठ

        वन अकादमीचे वन विद्यापीठात रूपांतर करण्याच्या श्री. मुनगंटीवार यांच्या मागणीवर यासंदर्भात समिती स्थापन करावी,  समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

      वन अकादमीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीसही मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली.

           कोविड संकटाच्या काळात चंद्रपूर वन अकादमीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.आता अकादमीचे व प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सुरू करावयाचे असल्याने कोविड केअर सेंटरचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची पाहणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

           वन अकादमीचे रूपांतर वन विद्यापीठात करण्यासाठी समिती नेमावी,अकादमीतील रिक्त पदांची भरती करावी,अकादमीतील उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावाअकादमीत वनपर्यावरण व आयुर्वेदावर आधारित अभासक्रम सुरू करावेत अशा मागण्या यावेळी श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

                    00000

 नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे

खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

·       आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे

 

            मुंबई, दि. 24 : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

            यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणतात कीदुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

            धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्कसुरक्षित अंतरजंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

००००




महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे

केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन

 

            पुणे/दिल्ली दि. 23 : महिला सुरक्षिततेसंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन दिले आहे. संपूर्ण देशस्तरावर महिला व मुले यांच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा व कार्यपद्धती (SOP) होणे आवश्यक आहे असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

             महिला सुरक्षेसाठी कार्य करत असतांना दक्षतायोजना आणि पायाभूत सुविधांच्या कार्यपध्दतीबद्दल चांगली निगराणी आवश्यक आहे. रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीतील सुरक्षा प्रश्नांविषयी बैठक घेवून यावर विशेषत्वाने काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींना यावेळी बोलावण्यात यावे, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.  त्या आधाराने संबंधित विभागांना आणि संबंधित मंत्रालयांना योग्य त्या सूचना देण्यास तसेच विविध स्वरुपाच्या अत्याचाराच्या घटना आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन  प्रत्यक्षात कसा आणता येईल याचा देखील विचार करता येऊ शकेल अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

            पोलीस दलात त्याचप्रमाणे तीनही सैन्यदलात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये काम करत असणाऱ्या महिलांवरही अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अत्याचारपीडित महिलांना सर्वतोपरी मदत मिळण्यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्याची विनंती देखील या पत्राच्या माध्यमातून डॉ. गोऱ्हे यांनी संरक्षण मंत्री श्री. सिंह यांना केली आहे.

            देशाचे संरक्षण करणाऱ्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी झालेले अत्याचार अथवा कौटुंबिक हिंसाचार यासंदर्भात महिलांना मदत करणारी यंत्रणा सरकारने त्यांच्या पाठीशी उभी करणे गरजेचे आहे. या यंत्रणेमध्ये वैद्यकीयअर्थिक पाठबळसामाजिक समुपदेशनपुनर्वसन याचा देखील सहभाग आवश्यक आहेअसेही डॉ.गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

 कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे

                                             - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       रंगभूमी कलादालनबाबत आढावा

            मुंबईदि.24 :  महाराष्ट्राला रंगभूमीचा समृध्द इतिहास असून हा इतिहास आणि वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्र येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी रंगभूमी कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन होईल या पध्दतीने या कलादालनाचे काम व्हावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            मराठी रंगभूमी कलादालनाच्या उभारणीसंदर्भातील बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाईसिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्षआदेश बांदेकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिहबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,  पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गेअभिनेते सर्वश्री राजन भिसेविजय केंकरेऋषिकेश जोशीनाट्य दिग्दर्शक वामन केंद्रेअभिनेत्री सई गोखलेऑनलाईन पद्धतीने अभिनेते सुबोध भावे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीया रंगभूमी संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहासरंगभूमीची वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात येणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येण आवश्यक आहे. रंगभूमी कलादालन स्वयंपूर्ण आणि सक्षम होण्याबरोबरच नवीन पिढीलाही बांधून ठेवेल असे असणे आवश्यक आहे.

            मराठी रंगमंच कलादालन येथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेचपण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे.कलादालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृकृ-श्राव्य संग्रहालयत्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबरोबरच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भदस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

            कलादालनाच्या  निर्मितीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संहिता विकास समितीची (कंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच हेरिटेज कमिटी (पुरातत्व समिती) ची स्थापनाही करण्यात यावी. मराठी रंगमंच कलादालनात नाटकाचा उगम ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला जावासंगीतव्यावसायिकप्रायोगिक रंगभूमीदलितकामगार नाट्य चळवळ आणि त्याची वैशिष्ट्ये माहित व्हावीतज्येष्ठ मराठी नाटककारनेपथ्यकारलेखकनाट्य कलावंत यांचीही माहिती येथे उत्तम मांडणीतून उपलब्ध व्हावी असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

            भारतीय नाटक कलेच्या इतिहासात महाराष्ट्रातील रंगभूमीचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्रातील नाट्य चळवळीचा इतिहास दीडशे वर्षांहून अधिक आहे. आधुनिक नाटकांची चळवळ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच सुरु असून या नाटय परंपरेचे संग्रहालयाच्या रुपाने जतन होणे आवश्यक आहे.या संग्रहालयात नवीन इमारत आणि त्यामध्ये नाट्यपरंपरेच्या इतिहासाचे विविध टप्पे दर्शविणारी अनेक दालने उभारण्यात येणार आहेत. विशिष्ट काळातील नाटकांबद्दलची माहितीछायाचित्रेपॅनल्सदृकश्राव्य माध्यमेहोलोग्राफीक टेक्नॉलॉजीचा वापर करुन प्रदर्शित करण्यावर कसा भर देण्यात येणार आहे याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

Friday, 24 September 2021

 ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ

जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा

- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

·        महसूल व कृषी विभागाने टीम वर्क म्हणून काम करण्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

·        राज्यातील तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, तलाठी , कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक संघटनांसोबत  बैठक

 

               मुंबई दि. 21 : ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून महसूल व कृषी या दोन्ही विभागांनी समन्वयाची भूमिका घ्यावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत राज्यातील तहसीलदार, तलाठीतालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्या संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

                सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त धीरजकुमारजमाबंदी आयुक्त एन.के.सुधांशू यांच्यासह  तहसीलदार, तलाठीतालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          ई - पीक पाहणी हा प्रकल्प कृषी, महसूलपणन व इतर विभागांसाठी लाभदायक ठरणार असून हा प्रकल्प देशासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही महसूल मंत्री श्री.थोरात यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अनेक शेतकऱ्यांचे अर्ज दुरुस्ती अभावी प्रलंबित आहेत. ते अर्ज येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निकाली काढावेत, अशी सूचना श्री.थोरात यांनी केली.

          कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीमहसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी कार्य करीत असून पीकविमानैसर्गिक आपत्ती इत्यादी विषयात दोन्ही विभाग समन्वयाने काम करीत असतात. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनामध्ये टीम वर्क करून योजना राबविताना काही अडचणी असल्यास समन्वयाने मार्ग काढावा. ई - पीक पाहणी प्रकल्पात काही सुधारणा करणे गरजेचे असेल तर त्या अवश्य केल्या जातील.

एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहता काम नये

       ई - पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांच्या लाभापासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. हे पुण्याचे काम आहे या भावनेने त्याकडे पहावे. ई - पीक पाहणी प्रकल्पात सातबारावर पिकांची नोंद घेण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजून सांगावे, असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी केले.


 *भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांनी गायलेली 'श्री गणेश स्तृती' आपण अवश्य ऐकली पाहिजे. या विद्वान शास्त्रज्ञ राष्ट्रपतीने गणेशाची केलेली स्तुती आपल्याला मंत्रमुग्ध करेल.*


 

 

Featured post

Lakshvedhi