Thursday, 23 September 2021

 राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात

सुरू करण्यासाठी नियोजन करावे

                                      - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

·        कापूस खरेदी नियोजनाबाबत आढावा बैठक

 

            मुंबईदि. २२ : राज्यातील हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरवात करावी त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

            हंगाम २०२१-२२मधील कापूस खरेदी नियोजनाबाबत सहकार व पणन मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

            राज्यात खरीप हंगाम २०२१-२२मध्ये  ३९.३७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. मागील वर्षी ४२.०८ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता. यावर्षी कापूस   पेरा  ६.४४ टक्के घटला असली तरी  सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यानुसार राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदीकेंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी आणि या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

            ज्या तालुक्यात सर्वाधिक कापूसपेरा आहे तिथे प्रत्यक्ष खरेदी लवकर सुरू करण्यासाठीचे नियोजन करावे.शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य नियोजन करून कापूस खरेदी करावी, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

            या बैठकीला सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमारसहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे संचालक सतीश सोनी, सीसीआयचे जनरल मॅनेजर अतुल काला, संजय पाणीग्रही व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

 चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज;

9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन

 

          मुंबईदि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे.

           उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतआमदार दीपक केसरकरआमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.

           यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहेअसे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे.

          पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंहउद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंहमहाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूरएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगनसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी बैठकीला उपस्थित होते.

***


 

टाइम्स ग्रुपच्या द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर’ पुरस्काराने

उद्योगमंत्री सुभाष देसाई सन्मानित

 

          मुंबईदि. 23 : टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोरपुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना प्रदान करण्यात आला.

            मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताजमध्ये झालेल्या सोहळ्यात श्री. देसाई यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीसंचालक आदी उपस्थित होते.

          पुरस्काराला उत्तर देताना उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणालेकोरोना संकटकाळात उद्योगचक्र गतिमान ठेवण्यात उत्पादन क्षेत्राचा मोठा वाटा राहिला. उत्पादन क्षेत्रातील जाणकारांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन नवनवीन धोरणे ठरवत आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांत राज्यात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यातून सुमारे तीन लाख जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. उद्योगक्षेत्राने राज्य शासनावर दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले. जगाची गरज ओळखून उद्योगक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडत आहेत. ते स्वीकारून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

          या सोहळ्यादरम्यान विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत परिसंवाद झाला.

***

 लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन

संस्थेच्या सल्लागार मंडळाचे पुनर्गठन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन समिती मार्फत

पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येणारशासन निर्णय निर्गमित

 

            मुंबई, दि. 22 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार समितीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुराव्याने पुनर्गठन करण्यात आले आहे.

            या सल्लागार समितीमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्यासह शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्रभाकर कराडकायदा तज्ज्ञ ॲड.संजय काळबांडेशिक्षण तज्ज्ञ प्रा.वसंत सानपसमाजशास्त्र अभ्यासिका डॉ.स्मिता अवचारउद्योजक सुनील किर्दकअर्थतज्ज्ञ डॉ.आर.एस. सोळंकेकृषितज्ज्ञ निवृत्त भा.प्र.से. डॉ.भास्कर मुंडेसमाजशास्त्र अभ्यासक डॉ.भारत खैरनार व अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र काळे यांचा समावेश करण्यात आला आहे.

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या नावाने स्वतंत्र पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वायत्त बहाल करण्यात आले असून याबाबतचा शासननिर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. या पदवी व पदविका संस्था व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे या निर्णयात म्हटले आहे.

            सल्लागार मंडळास आवश्यक असणारा निधीत्याचे स्वतंत्र लेखापरीक्षण तसेच फेलोसिनिअर फेलो अशा विविध पदांची व कंत्राटी पदांची भरती करण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे.

            ग्रामीण कौशल्य विकासशेतीआधारीत विशेष शिक्षण आदी महत्वाच्या विषयांशी संलग्न असलेली ही संस्था मागील अनेक वर्षांमध्ये केवळ घोषणा व कागद इतकीच मर्यादित राहिली होतीपरंतु धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळास व संस्थेस मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. श्री.मुंडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2031 अंतर्गत

2000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 23 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे 6.78 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2031 चे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

          रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ/ 10.19/ प्र.क्र. 10/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                          

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 सप्टेंबर2021 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 28 सप्टेंबर2021 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29  सप्टेंबर 2021 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा  कालावधी 10 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. 25 मे 2021 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 मे 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 25 नोव्हेंबर व 25 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 23 सप्टेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली

Negetivity convert in positivity


 

Tip's

 🩸 *तब्येती का बिघडतात ?*


मनांत खूप साचलं की

कुणाजवळ तरी बोला,

ऐकणाऱ्याचा खांदा

होऊ द्या की ओला.


धरण पूर्ण भरल्यावर

जसे दरवाजे उघडतात,

माणसं तसं वागत नाहीत

म्हणून तब्येती बिघडतात.


त्यामुळेच आग्रह आहे

मन मोकळं करा,

एखाद्या तरी मित्राचा

हात हातात धरा.


जे वाटतं ते बोलून टेन्शन

करा कमी,

व्यक्त होण्यातच

आरोग्याची हमी.


जर कुढत बसाल तर

विपरीत परिणाम होणारच,

बीपी, शुगर, ECG

कमी जास्त होणारच.


दुःख सांगायला कोणी नसणे

जागतिक समस्या आहे,

अनेक रोगाचं कारण हे

कुढत बसणं आहे.


रडायला जर जागा नसेल

लावा प्रॉपर्टीला काडी,

काय करायचं सोनं चांदी

बंगला फ्लॅट गाडी.


हजार वेळेस सांगितलं

माणसं जोडायला शिक,

तुला वाटतं पैसा करील 

सगळं काही ठीक.


जे होईल ते होईल म्हणून

झुगारून टाका भीती,

प्रत्येक क्षण जगून घ्या

नका म्हणू 

*'आत्ता उरले किती ' ?*🙏

      ********arogy

Health care tips

 *तांदळाच्या पेजेचे आरोग्यदायी फायदे*


१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.


२)  तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.


३) तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते.


४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.


५)  तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.


६) केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने  जुलाब बंद  होतात, 


७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.


८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.


९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते,  त्यामुळे उर्जा मिळते, बाहेर जातांना पिऊन जावे, दिवसभर ताजेतवाने वाटते.


१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी, आजारपणात  आलेली कमजोरी दूर होते.


११)  उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी  घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.


१२)  तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायम होतो, काळे डाग निघून जातात.


१३)  केसांकरता उत्तम  टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडी केसांची समस्या दूर होते, कारण यात  मुबलक विटामिन, मिनरल असतात.


१४)  तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशी आटोक्यात राहतात.


१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते.  त्यामुळे आरोग्य चांगले राहते.


२६) डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची  पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.


१७) सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणी प्यायल्यास    प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.

Featured post

Lakshvedhi