Wednesday, 22 September 2021

 गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या

नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे

पोलिसांना सक्त निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला

लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश

 

            मुंबईदि. 21 : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            गडचिरोली जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांना हे आदेश दिले.

            गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका 50 वर्षीय व्यक्तीची नुकतीच हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर पालकमंत्री शिंदे यांनी  तातडीने बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सदर मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

            सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाप्रशिक्षण केंद्र यांचे काम नीट सुरू आहे अथवा नाही याबाबत आढावा घ्यावा आशा सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तसेच सुरजागड आउटपोस्टच्या कामाचा आढावा घेतला. पोलिसांनी गस्त घालताना पुरेशी काळजी घ्यावी अशी महत्वपूर्ण सूचनाही केली.

            पोलिसांची या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालीवर लक्ष असल्याचे यावेळी गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. सुरजागड हा छत्तीसगड मधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग असलातरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.   

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला जेरबंद करा

            गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत दिले. यासाठी 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याचे निर्देश श्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

            गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात 17 नागरिकांचा मृत्यू झाला असून 500 हुन अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही हा वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश श्री.शिंदे यांनी दिले आहेत.

            'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया' च्या चमूत पशु वैद्यकीय अधिकारीशास्त्रज्ञबायोलॉजिस्ट अशा तज्ञ व्यक्तींचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून या वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

            या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळीजिल्हाधिकारी संजय मीनागडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयलमुख्य वन संरक्षक अधिकारी श्री.मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

0000

 A Simple Formula for Happy Life ... Never try to Defeat Anyone ... Try to Win Everyone ... Don't Laugh at Anyone ... Laugh with Everyone ...🌹

Good morning 🌹

 प्रिय मित्रांनो ! 

समजा, तुम्ही बाहेरगावी गेलात  आणि तिथे तुमच्याकडे असलेली नगद रक्कम संपली तर ? 


समजा, तुम्ही प्रवासात आहात आणि कुणीतरी तुमची पर्स चोरली तर?


 समजा, तुम्ही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरी राहतात आणि तुम्हाला तात्काळ फी भरायची आहे. तर? 


 समजा, दुसऱ्या गावात असतांना अचानक दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली तर? 


समजा…. असो मंडळी ! 


अशा अचानक संकटात सापडण्याच्या शक्यता भरपूर आहेत.


 पण अशावेळी आपण काय करतो ? सुरुवातीला भांबावून जातो.


 कारण जवळ काहीच पैसे नसतात. एटीएम कार्ड चोरीला गेले असते. जर सोबत असेल तरी त्यांच्याही अकाउंटमध्ये गरजेइतके पैसे नसू शकतात.


 अनोळखी शहरात कुणी ओळखीचे नसते. मदत मागायची तरी कोणाकडे ? 


आणि ओळख पाळख नसतांना कुणी पैशांची मदत करेल याची शक्यता फारच कमी ! 


या अडचणीवर एक उपाय आहे! उपाय साधा सोपा आहे आणि खात्रीचा सुद्धा ! 


अशावेळी तुम्ही सरळ पोस्ट खात्याला शरण जा. तिथं  तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.


 तुम्ही आपल्या नातेवाईक/मित्रांकडून पैसे एका मिनिटात पोस्टात मागवू शकता आणि दुसऱ्या मिनिटाला ते त्वरित काढू शकता. ते सुद्धा पोस्टात अकाउंट नसतानाही...  आश्चर्य वाटलं ना ? 

पण हे खरं आहे. भारतीय पोस्टाने ही सेवा सुरू केली आहे. नाव आहे, इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO).


"इन्स्टंट मनी ऑर्डर" ही वेबवर आधारित सेवा आहे. ही सेवा काही मिनिटांतच पैसे एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्यासाठी मदत करते. याद्वारे १००० ते ५०००० पर्यंत रक्कम पाठवता येते. 


iMO चं काम कसं चालतं?


जी व्यक्ती पैसे पाठवणार आहे, तिला कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक फॉर्म भरून काउंटर क्लार्ककडे रक्कम जमा करावी लागतो.


 मग कॉम्प्युटरद्वारे त्याची पावती मिळते. 


ही पावती जरा वेगळ्या स्वरूपाची असते. ती सीलबंद स्वरूपात येते. या पावतीमध्ये एक १६ अंकी सिक्रेट कोड असतो. हा कोड क्लार्कलासुद्धा माहीत नसतो.


 मग ती पावती उघडून तो कोड ज्या व्यक्तीला पैशांची गरज आहे तिला सांगायचा. 


हे काम तुम्ही कॉल करून, एसएमएस करून, व्हाट्सअप वरून किंवा इ-मेल द्वारे कसेही पाठवू शकता. 


आता ती दुसरी व्यक्ती जिला पैसे हवे आहेत ती कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक छोटा फॉर्म ओळखपत्राच्या पुराव्यासह भरून देईल. 


त्यात तो 16 अंकी कोड लिहायचा असतो. दुसऱ्याच मिनिटात त्या व्यक्तीच्या हातात पैसे मिळतील. आहे ना अगदी सोपं ? 


पुराव्यासाठी कोणते ओळखपत्र लागतात?

 

ज्यावर फोटो आहे असं कोणतंही ओळखपत्र, म्हणजे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादीपैकी काहीही चालू शकेल. 


ही सेवा खर्चिक आहे का?

 

अजिबात नाही ! मंडळी यासाठी फक्त शंभर रुपयांच्या आसपास कमिशन लागते. एवढी मोठी रक्कम तुम्ही अगदी अल्प दरात पाठवू शकता.


1000 ते 10000 ला 100 रुपये कमिशन

10001 ते 30000 ला 110 रुपये कमिशन

30001 ते 50000 ला 120 रुपये कमिशन


एवढंच नाही तर तुम्ही पैशांसोबत एखादा छोटा मेसेज सुद्धा पाठवू शकता.


 हा संदेश  पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी वाचू शकत नाही.


संकलन: अनिरुद्ध पळशीकर, पुणे.

उपयुक्त संदेश सर्वांना फॉरवर्ड करावा.🙏

Tuesday, 21 September 2021

 निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे

                                                     - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

·        दोन दिवसीय वाणिज्य उत्सवाचे उद्घाटन

            मुंबईदि. 21 : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर  एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उदिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वपुर्ण ठरणार आहेअसे उद्गार केंद्रीय रेल्वे,कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथिल जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सवया परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

            या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्रदर्शन दालनांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरेउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंगविदेश व्यापार महानिदेशालयाचे (DGFT) अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डीजेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाहजागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री,  उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित  होते. 

निर्यातवाढीस चालना देणे ही सर्वांची जबाबदारी

            केंद्रशासनातर्फे निर्यात वाढीस चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती देऊन श्री. दानवे म्हणालेनिर्यातवाढीस चालना देणे ही केवळ उद्योग विभागाची जबाबदारी नसून यात अनेक घटकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. कोरोनाच्या संकटानंतर देशाची आर्थिक स्थिती आता हळूहळू पूर्ववत होत आहे. जागतिक क्रमवारीत देश 11व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर पोहचला आहे. 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

            निर्यात क्षेत्रात एमएसएमई उद्योगाचे योगदान उल्लेखनीय आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन (एस ई झेड)) चे महत्व या निमित्ताने अधिक अधोरेखीत झाले आहे. याचाच परिणाम म्हणून जीडीपीतही  लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अधिकाधिक गुंतवणूकदार देशाकडे आकर्षित होत असल्याचेही श्री दानवे यांनी यावेळी सांगितले.

परिषदेतून महत्वाच्या सूचना अपेक्षित - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत होणाऱ्या चर्चासत्रांच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना येतील त्यांचे स्वागत केले जाईल असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिषदेसाठी दिला. मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरुपात पाठविलेल्या संदेशाचे वाचन अतिरिक्त मुख्य  सचिव बलदेव सिंग यांनी केले. अशा प्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून नविन संकल्पना पुढे येतातअनेक उद्योजकांना नवे मार्ग शोधता येतात त्यामुळे अशा परिषदांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

निर्यातीचे लक्ष्य पूर्ण करण्यात राज्य अग्रेसर असेल

                                                   -उद्योग मंत्री सुभाष देसाई

            देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 25 टक्के आहे. केंद्र शासनाने भारतातून सुमारे चारशे मिलीयन डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर असेलअसा विश्वास उद्योगमंत्री सुभाष  देसाई यांनी व्यक्त केला. 

            श्री. देसाई म्हणालेमहाराष्ट्र शासनाने निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वतंत्र निर्यात धोरण तयार केले आहे. निर्यात क्षेत्राला अधिक गतीमान करण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात औरंगाबाद येथे ऑरिक सिटी उभी  करण्यात आली आहे. या ठिकाणाहून तयार होणाऱ्या अधिकाधिक वस्तूंची निर्यात व्हावीअशी अपेक्षा आहे. याशिवाय कोकणातील रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क सुरू केले जात आहे. ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग आहे.  याद्वारे औषध निर्मिती क्षेत्रात देश स्वावलंबी होण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरेल.

            महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र निर्यात परिषद स्थापन केली असून त्यातून निर्यातदारांना हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. याशिवाय प्लग अँड प्लेमहापरवाना आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गुंतवणूकदारांसाठी रेडी शेड संकल्पना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

राज्यातील उद्योगांना परवडणारी वीज देण्यासाठी वीज वितरणाचे परवाने देण्याची योजना हाती घेतली आहे. यामुळे उद्योगांना स्वस्तात वीज मिळणार आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या औद्योगिक वसाहतींसाठी ही योजना नवसंजीवनी ठरेल. या निर्णयामुळे महाराष्ट्राचे उद्योगक्षेत्र अधिक मजबूत बनेल.

            याशिवाय विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या लघु, सुक्ष्म उद्योगांसाठी राज्य शासनाने अभय योजना आणली आहे. बंद पडलेले छोटे मोठे उद्योग याद्वारे पुन्हा सुरू होऊ शकतील. या योजनेत छोट्या उद्योगांचा थकित जीएसटीवीजबीलावरील व्याज व इतर थकित व्याज माफ केले जाणार आहेत. यामुळे बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू होतील.

            नवी मुंबई परिसरात जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी शासनाने भूखंड दिला आहे. त्यातून देशातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलर्स पार्क उभे राहीलयात एक लाख कामगार काम करतील. लवकरच या केद्राचे उद्घाटन करू असा विश्वास श्रीदेसाई यांनी व्यक्त केला.

प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र अग्रेसर

- उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे

            कोविड परिस्थितीत आरोग्य विभागाच्या बरोबरीने उद्योग विभागाने काम करुन प्रतिकूल परिस्थितीतही राज्याचे अर्थचक्र सुरळीत सुरु ठेवण्याची महत्वाची कामगिरी बजावली  आहे. त्याचप्रमाणे  कोरोना काळातही एक लाख 30 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार राज्यात झाले आहेत. असे  गौरवोद्गार उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी काढले.

            उद्योग राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्याराज्यातून निर्यात होणाऱ्या उद्योगांसाठी विभागातर्फे सातत्याने सहकार्याची भूमिका असते. टेक्स्टाईलफिशरिजजेम्स यासारख्या क्षेत्रातील निर्यातीत कायम आघाडी घेतली आहे. निर्यात क्षेत्रात देशातील इतर राज्यांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी केली जाईल असा विश्वास व्यक्त करुन यासाठी राज्यातील निर्यातदारांना केंद्राकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंगविदेश व्यापार महानिदेशालयाचे (DGFT) अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डीजेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाहजागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री यांचीही भाषणे झाली. उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र हे निर्यात क्षेत्रात अग्रेसर रहावे यासाठी उद्योग संचालनालयाद्वारे या ‘महाएक्स्पो कॉन्क्लेव्ह’ची आखणी वाणिज्य सप्ताह मध्ये करण्यात आली असून प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यात जागरुकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे उद्योग विभागाचे आयुक्त तथा राज्याचे निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी स्थापन करण्याताली असून जिल्हा निहाय निर्यात आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योग विभागाचे सह आयुक्त श्री. लोंढे यांनी आभार मानले.

      आजादी का अमृत महोत्सव"- 75 व्या स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20 ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाणिज्य सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. यातउद्योजकनिर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारीनिर्यातदारशासन विभागाचे अधिकारी इत्यादिंचा प्रामुख्याने समावेश आहे.

            या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC)  आणि जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर)यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. 

विविध विषयांवरील चर्चा सत्रांना प्रतिसाद

            दोन दिवसांच्या या परिषदेत  एकूण 10 पॅनल चर्चा आहेत.-शासनाच्या  पाठिंब्याच्या माध्यमातून  द्विपक्षीय व्यापार संधीपायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स डेव्हलपमेंट क्रेडिट गॅरंटी  इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यातील निर्यात संधीपायाभूत सुविधाबॅंकींग आणि वित्तीय सहकार्य याशिवाय खाद्यकापडइंजिनिअरिंगकेमिकल आणि औषध निर्मितीजेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे (Panel Discussion) होत आहेत. या पॅनल्समध्ये रशियातुर्कीदक्षिण आफ्रिकास्पेन आणि मॉरिशसचे राजनैतिक प्रतिनिधित्व होते. या चर्चासत्रांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

००००


  

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एका वर्षात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

---

नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता

 

            मुंबईदि. 21 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने यास १७ तारखेला मान्यता दिली असून यावर्षी एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे महाविद्यालय सुरू होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबद्दल खासदार विनायक राऊतराहुल शेवाळेआमदार रवींद्र वायकरसुनील प्रभूश्री.अरूण दुधवडकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.   

00000


 

सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम2021 बाबत

45 दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : केंद्र शासनाने 29 कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन 4 कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास 40 वर्षांनी होत आहे.

1.         वेतन संहिता  (एकूण 4 अधिनियम)

2.         औद्योगिक संबंध संहिता (एकूण 5 अधिनियम)

3.         सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण 9 अधिनियम)

4.        व्यावसायिक सुरक्षाआरोग्य आणिर कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण 13 अधिनियम)

            केंद्र शासनाने 29 सप्टेंबर 2020 रोजी पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता अधिनियम2020 च्या कलम 156 (2) अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सामाजिक सुरक्षा संहिता नियम2020, 13 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याअनुषंगानेराज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

            केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा संहितेच्या अुनसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या सामाजिक सुरक्षा संहिता नियम2020 च्या कलम 156(2) अनुसार राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात (www.dgps.maharashtra.gov.inआणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.inप्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटनाकामगार वर्गमालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियम2021 बाबत सूचना आणि  हरकती कामगार आयुक्तकामगार भवनई ब्लॉकब्रांदा-कुर्ला संकुलवांद्रे (पूर्व)मुंबई-400051 यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

००००


 

वेतन संहिता मसुदा नियम2021 बाबत

45 दिवसात सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : केंद्र शासनाने 29 कामगार कायद्यातील तरतूदी एकत्रित करुन 4 कामगार संहिता पारित केलेल्या आहेत. विविध कामगार कायद्यातील बदल हा जवळपास 40 वर्षांनी होत आहे.

1.         वेतन संहिता  (एकूण 4 अधिनियम)

2.         औद्योगिक संबंध संहिता (एकूण 5 अधिनियम)

3.         सामाजिक सुरक्षा संहिता (एकूण 9 अधिनियम)

4.        व्यावसायिक सुरक्षाआरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता (एकूण 13 अधिनियम)

            केंद्र शासनाने 8 ऑगस्ट 2020 रोजी पारित केलेल्या वेतन संहिता अधिनियम2019 च्या कलम 67 अनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये वेतन संहिता नियम,  2020, 7 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याअनुषंगानेराज्यातील कामगारांना वेतन संहितेच्या तरतूदी कशाप्रकारे लागू होतील यासाठीच्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

            केंद्र शासनाच्या वेतन संहितच्या अुनसार महाराष्ट्र राज्यात लागू करावयाच्या नियमांचा प्रारुप मसुदा विभागाने अंतिम केला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या वेतन संहिता नियम2020 च्या कलम 67 अनुसार राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियमांचे प्रारुप दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या राजपत्रात (www.dgps.maharashtra.gov.inआणि शासकीय संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.inप्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये बाधित होणाऱ्या कामगार संघटनाकामगार वर्गमालक आणि विविध सामाजिक घटकांकडून राज्यात लागू करावयाच्या वेतन संहिता मसुदा नियम2021 बाबत सूचना आणि  हरकती कामगार आयुक्तकामगार भवनई ब्लॉकब्रांदा-कुर्ला संकुलवांद्रे (पूर्व)मुंबई-400051 यांचेकडे व्यक्तीश:, पत्राद्वारे अथवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

००००

 *स्मृतिगंध .....* 👌🏼👌🏼


मला आठवतंय,...

*खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !*

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा ! 

भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात... कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची...

     

*आता तसं नाही...*

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण !

    

*पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,* 

फुल टाईम 'आईच' असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

  

*आता 'मम्मी' थोडी महाग झालीय* 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते! 

   

*मित्र* सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं *बट्टी* म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी ! 


*आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,* 

*"डोन्ट शेअर युअर टिफिन हं !"* 

मैत्री बरीच महाग झालीय आता. 

   

*हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !* सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती. 


*घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना* पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

   

*ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.* 

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची. 


*आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,* 

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

   

एवढंच काय, तेव्हाचे 

*आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले.* 

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची. 


*आज सगळंच विचित्र दिसतंय... आपल्या अवतीभवती !* 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं ! 

   

*कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं,* 

पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

    

*म्हणून म्हणतोय आहोत तोवर आठवत रहायचं,* 

नाहीतरी ह्या *स्मृतीगंधा* शिवाय आहे काय आपल्याजवळ !

🌹🌹🌹🌹🌹🌹

संकलन शैलेश उर्फ प्रमोद

Featured post

Lakshvedhi