Tuesday, 21 September 2021

 *प्रेम हवय तर समर्पण खर्च  कराव लागेल,*

*विश्वास हवा तर निष्ठा खर्च करावी लागेल,*

*सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल*,

*कोण म्हणत,*

*नाती फुकटात मिळतात?*

*फुकटात तर वारा सुध्दा मिळत नाही*

*एक श्वास पण तेव्हा मिळतो,*

*जेव्हा एक श्वास सोडून जातो*


         

            💐   *शुभ सकाळ*  💐


 

 नमस्कार,


एक छोटी मदत आवश्यक आहे. तुम्ही कृपया हा संदेश ज्ञात गटांमध्ये पोस्ट कराल जेणेकरून ते प्रसारित होईल .... 


जर तुम्हाला गरीब आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले कोणतेही उज्ज्वल विद्यार्थी आढळले असतील, ज्यांनी यावर्षी दहावीचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि 80% पेक्षा जास्त गुण मिळवले असतील, तर कृपया त्यांना सांगा...

स्वयंसेवी संस्थेशी संपर्क करण्यासाठी - 

प्रेरणा (इन्फोसिस फाउंडेशनद्वारे समर्थित). 

स्वयंसेवी संस्था लेखी परीक्षा घेत आहे आणि जे परीक्षा उत्तीर्ण करतात, ते त्यांच्या पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदतीस पात्र असतील.

कृपया विद्यार्थ्यांना खाली नमूद केलेल्या लोकांशी संपर्क साधण्यास सांगा.

फॉर्म: संपर्क क्रमांक:

1. सुश्री. सरस्वती - 99009063382.

श्री. शिवकुमार - 99866303013.

सुश्री. बिंदू - 9964534667

 जरी तुम्हाला माहित नसेल तरीही कोणीही, कृपया ही माहिती द्या, कुणाला याची गरज असू शकते. www.infosys.com/infosys-foundation

 धन्यवाद !

 कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 

            मुंबईदि. 20 : कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.

            पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरीमहानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीसंबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            श्री ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्सऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. महिलांच्या लसीकरणाबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

            मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून श्री ठाकरे म्हणालेयापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थीकामावर जाणारे नागरिक यांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारतीकार्यालयेगृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेलत्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावाअशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

 कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी

 अनुदान मंजुरीसाठी समिती पुनर्गठीत

 

            मुंबईदि. 20: राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली आणि प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

            महाराष्ट्रातील सर्व लोककला टिकून राहाव्यात,लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी लोककलांना उत्तेजन द्यावे या हेतूने कलापथकांना भांडवली खर्चासाठी आणि प्रयोगासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदान मंजुरीसाठी शासनामार्फत समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे.

            या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष तर सहसंचालक हे सदस्य सचिव असतील. माया खुटेगावकरसुधीर कलिंगणदिनेश गोरेअभय तेरदाळेपुरुषोत्तम बोंद्रेअलंकार टेंभुर्णेसुरेशकुमार वैराळकरअंबादास तावरेविलास सोनावणेमोहित नारायणगावकर हे या समितीत सदस्य असतील.  ही समिती 8 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत कार्यरत असेल.

0000

 वर्षा आंधळे/विसंअ/20 सप्टेंबर 2021 


चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

           

            मुंबईदि. 20 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने  परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

            पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले कीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने 966 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून 100 विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असेही श्री.सामंत यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

Featured post

Lakshvedhi