Monday, 20 September 2021

 निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी

वाणिज्य उत्सवाचे आयोजन

·       केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत

उद्योग मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

             मुंबईदि. 20 : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सवपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथिल जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रेल्वेकोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरेउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंगउद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत.

      आजादी का अमृत महोत्सव"- 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20 ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाणिज्य सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यातउद्योजकनिर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारीनिर्यातदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

            या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC) यांचे मार्फत करण्यात येत आहे.

            कार्यक्रमांत राज्यातील निर्यात संधीपायाभूत सुविधाबॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्यकापडइंजिनिअरिंगकेमिकल आणि औषध निर्मितीजेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे (Panel Discussion) तसेच प्रदर्शन दालनांमार्फत (Stalls) माहिती देण्यात येणार आहे.

***

 *अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात...*

*गिरवली तर अधिक लक्षात रहातात,आणि वाचली तर अधिक समजतात...*!


           🌺 *शुभ  सकाळ* 🌺

Tortoise rabit race


 

 *When You Want More Time*

*To Take Correct Decision,*

*Then Remember,*

*Even A Correct Decision Is Wrong When Its Too Late*

*life Is Time's Game. *

*Good Morning*😊


 

 *अनंत चतुर्दशी*


ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत - चतुर्दशी !


जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत - चतुर्दशी  !

            

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा...


थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडु मोदक खाऊन घेऊया...


इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा...


मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद...


जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला...


बाप्पा सारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा  दिवसांचे पाहूणे आपण 

असे समजून जगायचे...


किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख...


पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............

  🙏🏻

Sunday, 19 September 2021

 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही मिळणार आता दिल्लीच्या धर्तीवर शिक्षण

राज्यमंत्री सत्तार यांच्या प्रयत्नांना यश;

ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची केली स्थापना

 

               मुंबई, 19-  राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळावे याकरिता महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिल्ली निगमच्या शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता राज्यमंत्री सत्तार आग्रही होते. यासंदर्भात त्यांनी ग्रामविकास विभागाला प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर ग्रामविकास विभागाने यासाठी सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली असून दिल्लीच्या शैक्षणिक कार्य पद्धतीवर ते अभ्यास करणार आहेत. त्यामुळे श्री. सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, असाही राज्यमंत्री सत्तार यांचा मानस आहे.

               आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगत तंत्रज्ञानासह जगातील सर्व अत्याधुनिक शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दिल्ली निगमच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल व सुधारणा झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता वापरण्यात येणारे तंत्रज्ञानविद्यार्थी व शिक्षकांकरिता असणाऱ्या सुविधाविद्यार्थ्यांचे आचार-विचार व शिस्तशिक्षकांची शिकवण्याची कार्यपद्धती याचा सखोल अभ्यास तज्ज्ञ मंडळी करणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला ते सादर करतील.

               दिल्ली निगमच्या शाळांच्या शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ग्रामविकास विभागाने सात तज्ज्ञांच्या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. बी. बी. चव्हाणसेवानिवृत्त विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था आर.एस. शेख, फर्दापूर येथील सहशिक्षक काशिनाथ पाटीलअहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळेऔरंगाबाद जिल्ह्यातील वरूर तालुका सिल्लोड येथील सहशिक्षक जगन सुरसे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोण्हाटी येथील मुख्याध्यापक सुनीलची चिपाटे यांचा समावेश आहे.

Featured post

Lakshvedhi