Monday, 20 September 2021

 निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी

वाणिज्य उत्सवाचे आयोजन

·       केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत

उद्योग मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

             मुंबईदि. 20 : निर्यात क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सवपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथिल जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय रेल्वेकोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरेउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंगउद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित राहणार आहेत.

      आजादी का अमृत महोत्सव"- 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.20 ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत वाणिज्य सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यातउद्योजकनिर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारीनिर्यातदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

            या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC) यांचे मार्फत करण्यात येत आहे.

            कार्यक्रमांत राज्यातील निर्यात संधीपायाभूत सुविधाबॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्यकापडइंजिनिअरिंगकेमिकल आणि औषध निर्मितीजेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातील संधी याविषयावर चर्चासत्रे (Panel Discussion) तसेच प्रदर्शन दालनांमार्फत (Stalls) माहिती देण्यात येणार आहे.

***

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi