Friday, 17 September 2021

 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा- सुविधा पोहोचवाव्यात

                                        - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

·       पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

                                                           

            मुंबई, दि. 16 : पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू  करण्यात आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा - सुविधा पोहोचवाव्यात, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

            पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

          उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नगरविकास मंत्री श्री.शिंदे हे विविध विषयांवर काळजीपूर्वक दखल घेत असतात. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळातील भत्ता न घेता आपली सेवा चोखपणे बजावली आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.    

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगानुसार

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

            नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची केंद्र व राज्य सरकारप्रमाणे 7 वा वेतन आयोग  लागू करण्याबाबत बऱ्याच दिवसांची मागणी होती. यासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल. प्रशासनामध्ये काम करीत असताना आपली सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे. असे नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी सांगितले. प्रशासनातील सर्वांनीच समन्वयाने एकत्र काम केले पाहिजे. तसेच आपली सेवा चोखपणे बजावून जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्पर रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सन 2020- 2021 च्या अंदाजपत्रकात 7 व्या वेतन आयोगासाठी 100 कोटी एवढ्या रकमेची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. स्थायी आस्थापना खर्चामध्ये तसेच वेतन वाढीसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे 7 व्या वेतन आयोगानुसार 1.1.2016 ते 31.3.2020 या कालावधीतील फरकाची रक्कम सलग तीन हप्त्यात देण्यात यावी व 1.4.2020 पासून 7 वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत फरकाची रक्कम एकरकमी रोखीने देण्यास महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा प्रश्न निकाली लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

 वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

·        त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून करणार पूल दुर्घटनेची चौकशी

·        जखमी कामगाराची मंत्री शिंदे यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन घेतली भेट

 

            मुंबईदि. 17: वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर अचानक कलंडल्याने  14 कामगार जखमी झाले.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

             ही दुर्घटना दुर्दैवी असून दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असलेतरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.

जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन घेतली भेट

            या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एक कामगार डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे. मंत्री शिंदे यांनी व्ही.एन देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या.

            यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास रावस्थानिक पोलीस अधिकारीएमएमआरडीएचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

 प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाने

वैज्ञानिक जगताची मोठी हानी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

        

         मुंबईदि. 17 :- पुण्यातील आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापकज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनान भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली. उदयोन्मुख वैज्ञानिकांना संशोधनाची दिशा दाखवली. भारतीय जनमानसात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेल योगदान कायम स्मरणात राहील.  प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनान भारतीय भौतिकखगोल विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा मार्गदर्शक हरपला आहे. वैज्ञानिक जगताची मोठी हानी झाली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

००००

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगीदीर्घायुष्य लाभोत्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडोअशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

            पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीभारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचंअपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकताअखंडतासार्वभौमत्वसंविधानलोकशाही व्यवस्था अबाधित राहो. देशातील महागाईबेरोजगारीकोरोनासह आर्थिकसामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळोअशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्यायविकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईलअशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.

000

 


 

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

            मुंबईदि. 17 :- महाराष्ट्राच्या भूमीत विज्ञानवादीसुधारणावादी विचार रुजवणारे क्रांतिकारी नेतेसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचं नेतृत्वं स्वर्गीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचंविचारांचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे.

            प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेप्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढीपरंपराजातीव्यवस्थाअस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाहकेशवपनहुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं प्रबोधनकार होते. लेखकपत्रकारइतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचं नेतृत्वं म्हणून त्यांचं योगदान खुप मोठं आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतीलअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

०००


 

मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचाशौर्याचासंघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थगोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्वं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच आहे. देशाची एकताअखंडतासार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्यात्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील. मी त्यांना वंदन करतोअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करुन राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दलस्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करुयाअसं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केलं आहे.

००००

 सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी

नामांकने पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. 17 : देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक कार्य करणा-या व्यक्तीस किंवा संस्थेस त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने नामांकने पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि.मोरये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे.

            राष्ट्रीय एकात्मता दिन 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. व्यक्ती अथवा संस्था यांनी आपल्या कार्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग 31 ब यांच्याकडे पाठवावयाची आहे. या पुरस्कारासाठी कोणतीही भारतीय नागरिक वा भारतातील संस्था किंवा संघटना व्यक्ती अथवा संस्थेचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारासाठी नागरिकांनी नामांकने पाठवावीत असे आवाहनही श्री. मोरये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.        

 


 

Featured post

Lakshvedhi