Wednesday, 8 September 2021

 मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी

बीडीडी चाळ उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

           मुंबई दि.8 : - मुंबईतील वरळीनायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळ उच्चाधिकार समितीची बैठक वर्षा येथील समिती कक्षात झाली त्यावेळी ते बोलत होते.

        या बैठकीस गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेमुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेगृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरम्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          बी.डी.डी. चाळीमधील पोलीस सेवा निवासस्थानांचा ताबा म्हाडास हस्तांतरीत करणेबी.डी.डी. चाळीमध्ये दि.१.१.२०११ रोजी पर्यंत जे पोलीस कर्मचारी पोलीस सेवा निवासस्थानात वास्तव्यास आहेतत्यांना बी.डी.डी. पुनर्विकासांतर्गत ५०० चौ.फु. क्षेत्रफळाचा पुनर्विकसित गाळयाचे वितरण बांधकाम खर्चाची रक्कम आकारून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृह विभागासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी घेतली जावी असे बैठकीत निश्चित करण्यात आले.

           यापूर्वीही बी.डी.डी चाळीच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेतत्याच्या अंमलबजावणीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामध्ये बी.डी.डी. चाळीतील भाडेकरूंची पात्रता निश्चित करण्यासाठी संचालकबीडीडी चाळी यांना सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करणे,  बी.डी.डी. प्रकल्पांतील लाभार्थ्यांसोबत करण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क रु. १००० प्रति सदनिका इतका करण्याबाबतच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने आदेश/अधिसूचना काढणे,  पुनर्वसन इमारतीच्या गाळ्यांचे मालकी तत्वावर करारनामे करण्याकरिता म्हाडास अधिकार प्रदान  करण्याची झालेली कार्यवाहीम्हाडाच्या  प्रस्तावास अनुसरून नगर विकास विभागाने  अधिसूचनेन्वये बी.डी.डी. प्रकल्पांना असहकार्य करणाऱ्या भाडेकरांविरुध्द  निष्कासनाच्या कार्यवाही बाबत समाविष्ट  केलेली तरतूदीची अंमलबजावणीबी.डी डी. चाळीतील भाडेकरूंना स्थलांतरीत करावयाचे असल्यास व त्यांना संक्रमण शिबीर उपलब्ध नसल्यासअशा निवासी गाळेधारकाला रु.२२,०००/- आणि अनिवासी गाळेधारकाला रु.२५,०००/- प्रती माहे भाडे देण्यासंदर्भात केलेली कार्यवाही याबाबतची माहिती म्हाडाच्यावतीने बैठकीत देण्यात आली.

0000

देवेंद्र पाटील / वि. सं. अ./दि.8 सप्टेंबर 2021

Accelerate the construction work of BDD chawl Rehab project in Mumbai

Chief minister directs in the meeting of BDD chawl authority committee

 

          Mumbai, September 8:- Chief Minister Mr Uddhav Thackeray today directed the administration to accelerate the construction work of the BDD rehabilitation project at Worli, Naigaon and NM Joshi Marg of Mumbai. He headed a meeting of BDD chawl high power committee at meeting hall office of his official residence Varsha, today.

          Housing minister Dr Jitendra Awhad, environment and tourism minister Aditya Thackeray, chief secretary Sitaram Kunte, additional chief secretary to the chief minister Ashish Kumar Singh, principal secretary to the chief minister Vikas Kharge, principal secretary of the housing department Milind Mhaiskar, chief officer of MHADA, Mumbai Dr Yogesh Mhase and other senior officials were present on the occasion.

          The decision of the police service residences at the BDD Chawl to be handed over to MHADA was already taken earlier. Similarly, those cops staying in the BDD chawl till 1st of January 2011 will be provided redeveloped area of 500 square foot under the BDD chawl rehabilitation project by only charging them the construction expenses. Today's meeting decided that the housing department should conduct an independent meeting for preparing the list of the eligible beneficiaries of this project. Earlier too, many important decisions regarding the BDD chawl were taken and the chief minister took a stock of the implementation of such decisions and review the progress.

 सार्वजनिक गणेशोत्सव 2021 निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

 

            मुंबईदि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 29 जून 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

            1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

            2. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

            3. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

            4. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावेविसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

            5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

            6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोनामलेरियाडेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

            7. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

            8. आरतीभजनकीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

            9. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईनकेबल नेटवर्कवेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

        10.  दि.8 सप्टेंबर 2021 च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.

            11. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकानी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

            12. महापालिका विविध मंडळेगृहनिर्माण संस्थालोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

            13. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिकापोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

            हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले आहे.

००००

 मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी

बीडीडी चाळ उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

           मुंबई दि.8 : - मुंबईतील वरळीनायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बीडीडी चाळ उच्चाधिकार समितीची बैठक वर्षा येथील समिती कक्षात झाली त्यावेळी ते बोलत होते.

        या बैठकीस गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेमुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेगृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरम्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          बी.डी.डी. चाळीमधील पोलीस सेवा निवासस्थानांचा ताबा म्हाडास हस्तांतरीत करणेबी.डी.डी. चाळीमध्ये दि.१.१.२०११ रोजी पर्यंत जे पोलीस कर्मचारी पोलीस सेवा निवासस्थानात वास्तव्यास आहेतत्यांना बी.डी.डी. पुनर्विकासांतर्गत ५०० चौ.फु. क्षेत्रफळाचा पुनर्विकसित गाळयाचे वितरण बांधकाम खर्चाची रक्कम आकारून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृह विभागासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी घेतली जावी असे बैठकीत निश्चित करण्यात आले.

           यापूर्वीही बी.डी.डी चाळीच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेतत्याच्या अंमलबजावणीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामध्ये बी.डी.डी. चाळीतील भाडेकरूंची पात्रता निश्चित करण्यासाठी संचालकबीडीडी चाळी यांना सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करणे,  बी.डी.डी. प्रकल्पांतील लाभार्थ्यांसोबत करण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क रु. १००० प्रति सदनिका इतका करण्याबाबतच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने आदेश/अधिसूचना काढणे,  पुनर्वसन इमारतीच्या गाळ्यांचे मालकी तत्वावर करारनामे करण्याकरिता म्हाडास अधिकार प्रदान  करण्याची झालेली कार्यवाहीम्हाडाच्या  प्रस्तावास अनुसरून नगर विकास विभागाने  अधिसूचनेन्वये बी.डी.डी. प्रकल्पांना असहकार्य करणाऱ्या भाडेकरांविरुध्द  निष्कासनाच्या कार्यवाही बाबत समाविष्ट  केलेली तरतूदीची अंमलबजावणीबी.डी डी. चाळीतील भाडेकरूंना स्थलांतरीत करावयाचे असल्यास व त्यांना संक्रमण शिबीर उपलब्ध नसल्यासअशा निवासी गाळेधारकाला रु.२२,०००/- आणि अनिवासी गाळेधारकाला रु.२५,०००/- प्रती माहे भाडे देण्यासंदर्भात केलेली कार्यवाही याबाबतची माहिती म्हाडाच्यावतीने बैठकीत देण्यात आली.

0000

देवेंद्र पाटील / वि. सं. अ./दि.8 सप्टेंबर 2021


 महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

 

            महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी (निर्णय-1)

            मौजे कौडगावजिल्हा उस्मानाबाद येथे 50 मे.वॅ. क्षमतेचामौजे सिंदाला (लोहारा)जिल्हा लातूर येथे 60 मे.वॅ. क्षमतेचा तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे 20 मे.वॅ.,  परळी येथे 12कोरडी येथे 12व नाशिक 8 मे.वॅ. असे एकूण 52 मे.वॅ. क्षमतेचे आणि मौजे शिवाजीनगरसाक्री जिल्हा धुळे येथे 25 मे.वॅ. क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प असे एकूण 187 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

            या 187 मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकरीतामेसर्स. केएफडब्लू-बँक जर्मनी यांनी साक्री 150 मे.वॅ. क्षमतेच्या सौर प्रकल्पाकरीता केलेल्या प्रकल्प अर्थ सहाय्य करार वाढवून 2011 मधील शिल्लक प्रकल्प अर्थ सहाय्य (अंदाजे 72.81 दशलक्ष  युरो) मधून या प्रकल्पांना 588 कोटी 21 लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम केएफडब्लू - बँक जर्मनीकडून घेण्यासही मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांकरिता राज्यशासनाच्यावतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प महानिर्मिती कंपनी मार्फत इंजिनीयरींग – प्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन (EPC) तत्वावर उभारण्यात येणार असून. या 187 मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकारीता भाग भांडवल स्वरुपात सुमारे 158 कोटी 29 लाख रुपयांचा निधी महानिर्मितीच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तिय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यास मान्यता देण्यात आली. केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.

390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार (निर्णय-2)

            महानिर्मिती इंजिनीयरींग – प्रोक्युरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन (EPC) तत्वावर वाशिम जिल्ह्यातील  मौजे दुधखेडामौजे परडी ता. कमोरमौजे कंझारा येथे अनुक्रमे 60 मेगावॅट30 मेगावॅट व 40 मेगावॅट असे एकूण 130 मेगावॅट क्षमतेचे तसेच  वाशिम-1 प्रकल्पांतर्गत मौजे बाभूळगांव व मौजे सायखेडा येथे प्रत्येकी 20 मेगावॅट असे एकूण 40 मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-2 प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मौजे कचराळा येथे 145 मे.वॅ. क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मौजे मंगलादेवीमौजे पिंपरी इजारा व मौजे मालखेड येथे प्रत्येकी 25 मेगावॅट असे एकूण 75 मेगावॅट क्षमतेचे असे एकंदरीत 390 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.

            या प्रस्तावित 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांकरीता स्व-भागभांडवल वगळता 1564 कोटी 22 लाख रुपये खर्चासाठी केएफडब्लूबँकजर्मनी यांच्याकडून 0.05 टक्के प्रतिवर्ष या दराने कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. या कर्जाची कमाल 12 वर्षात परतफेड करण्याच्या अटीवर व नाविन्यपूर्ण प्रकल्प अटीनुसार नवीन प्रकल्प अर्थ सहाय्य मिळविण्याकरीताही मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पांकरिता राज्यशासनाच्यावतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. कर्जाव्यतिरीक्त लागणारे भाग भांडवल स्वरुपात सुमारे 364 कोटी 18 लाख रुपयांचा निधी त्यांच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तीय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.

 राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई- पीक पाहणी ॲप डाऊनलोड

·        जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राज्यात अव्वल

·        सर्वाधिक पीकांची नोंदणी नाशिकअमरावती विभागात

 

            मुंबईदि. 8 : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पांस राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

            त्यांनी दिलेल्या माहितीनुसारराज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात ( १.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे ( ९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती ( ८१ हजार ) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.

            ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारीतलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहेअसे श्री. जगताप यांनी सांगितले. सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई -पीक पाहणीचा १०० टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेतअसेही श्री. जगताप यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ॲप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावाअसे आवाहनही श्री. जगताप यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?

·       गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.

·       पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.

·       जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.

·       हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.

·       पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.

·       पिकांचा वर्गामध्ये एक पीक पद्धतीमिश्र पीकपॉलीहाउस पीकशेडनेटहाउस पीकपड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.

·       जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापुर्वी जमीनीत कायम पड क्षेत्र असल्यासप्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.

·       पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.

·       पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.

·       मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.

·       चालु हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.

·       जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.

·       त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचनतुषार सिंचनप्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

·       शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.

००००


 जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणी रस्त्यात चेकिंग करताना पोलीसांनी अडवलं तर -


आपली गाड़ी चुकुनही थांबवु नका,  त्वरीत पळुन जा! पळुन गेल्यावर  पोलिस आपल्या गाड़ीचा नंबर नोट करतील.


कारण  पिऊन गाड़ी चालवायचा दंड *१०,००० रुपये* आहे  आणि  पोलीसांनी थांबवल्यावर ऊभे न रहाण्याचा दंड फक्त *२००० रुपये.*


इतक्या छोट्याश्या माहीतीने सरळ ८००० रुपये आपण वाचवू शकता.


*सौजन्य -

*तळीराम मोटर ड्राइविंग स्कुल. अजुन टिप्स हव्या असतील तर बाटली घेऊन भेटा.*


😜💦🍷😎🍾😎🍷💦😜

 किस ऑफ लाईफ !


कालच्या पोस्टवर एकाने विचारलं की आयुष्याची उमेद राहिली नाही तरी जगायचं कशासाठी ?

उत्तर सोपं आहे. 

जगणं आपल्या हाती आहे. मरण आपल्या हाती नाही त्यामुळे जोवर मरण येत नाही तोवर जगण्यावर प्रेम केलं पाहिजे. 


आपण निराशावादी झालो की भवतालही नैराश्याने ग्रासला जातो, सगळं उदास वाटू लागतं. असा माणूस दुसऱ्याच्या आयुष्यात काय रंग भरणार कारण त्याचं स्वतःच्या असण्यावर प्रेम नसतं. 

एक साधा मेसेज सोबतच्या फोटोत दडला आहे.


घटना १९६७ सालची आहे. १७ जुलै १९६७,अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्सनविले शहर. 

एका ओव्हरहेड वायरमधून स्पार्किंग होत असल्याने विजेची समस्या उद्भवली तेंव्हा दोन लाईनमन्सवर दुरुस्तीची जबाबदारी सोपवली गेली. 

भर दुपारी त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. 

त्यांचं काम जवळपास उरकत आलं होतं आणि तेव्हढ्यात घात झाला. 


रॅन्डल चॅम्पियन ह्या तरुण लाईनमनकडून अनवधानाने दुसऱ्या एका उच्च दाबाच्या वायरला स्पर्श झाला आणि तो जागेवरच लटकला. त्या क्षणी तो मधल्या वायरवर लटकून काम करत होता आणि त्याच पोलवर त्याचा सहकारी जे. डी. थॉम्पसन हा काम करत होता. 


रॅन्डलला शॉक बसल्याचे निमिषार्धात त्याच्या लक्षात आले, पोलवर पाय ओणवे करून उभं राहत त्यानं त्याला कवेत घेतलं आणि ताबडतोब त्याला तोंडावाटे श्वास देणं सुरू केलं. 


रॅन्डलच्या सर्व हालचाली बंद होत्या, शरीर थिजलं होतं. तो कसलाही प्रतिसाद नव्हता तरीही तातडीच्या सेवेचं वैद्यकीय पथक येईपर्यंत थॉम्पसन अविरतपणे त्याला श्वास देत राहिला. 


एक वेळ अशी आली की दोघंही निळे पडले. 

मात्र थोड्याच वेळात वैद्यकीय पथक आलं. 

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवलं नि कमाल झाली !  


वैद्यकीय उपचारानंतर रॅन्डलचा श्वास पूर्ववत झाला. 

रॅन्डल जगला. 


रॅन्डलला जगवण्याचं श्रेय त्याच्या सहकारी मित्राला थॉम्पसनला जाते.


तिथं त्या क्षणी एखादा निराशावादी व्यक्ती असता तर त्यानं प्रयत्नच केले नसते, हाय व्होल्टेज वायरचा शॉक म्हणजे माणूस वाचणार नाही, तो गेलाच असणार म्हणून अश्रू ढाळत बसला असता. 


मात्र थॉम्पसनचं जगण्यावर प्रेम होतं, त्याला मित्राच्या श्वासाची खात्री होती, त्यानं हार मानली नाही. प्रयत्न जारी ठेवले. त्याचीच फलश्रुती म्हणजे रॅन्डलचं जगणं !


छायाचित्रकार रॉको मोरबिटो अग्नीशमनदलाच्या हरेक मोहिमेत जायचे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

१९६८ सालचा पुलित्झर हा छायाचित्रणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार या फोटोने जिंकला होता. 


जॅक्सनविले जर्नलचे संपादक बॉब पॅट यांनी फोटो पब्लिश करताना त्याला नाव दिलं 'किस ऑफ लाईफ' !   

खरेच हा टोटली किस ऑफ लाईफ होता. 


जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या एका व्यक्तीने मरणाच्या दारावर उभ्या असलेल्या मित्राला प्राण परत मिळवून दिले !


अनेक लोक कमेंटमध्ये वा इनबॉक्समध्ये विचारतात, आता जगण्यात मजा राहिली नाही, सगळं उदास वाटतं आता मी जगून काय करू ? आता जगायचं तरी कुणासाठी हा सूर त्यात असतो. 


अशांना माझं उत्तर एकच असतं - 

"जो स्वतःपुरता जगू लागतो त्याला हे विचार अधिक त्रास देतात. 

त्या उलट माझ्या आयुष्यात काही रंग उरले नाहीत तर मी इतरांचे आयुष्य रंगीत करेन असं ठरवायचं अवकाश की जगण्याची नवी उर्मी मिळते. जगण्यासाठीचं उद्दिष्ट कारण भवतालात डोकावलं तरी मिळतं मात्र त्यासाठी आधी अंतरंगात डोकावलं पाहिजे. 

मग आपणही आशावादी होतो नि आपल्या हातून एखाद्या जीवाचं भलं होऊ शकतं. 

आपलं जगणं सार्थकी लागण्यासाठी इतकं समाधानही पुरेसं ठरते. 

होय ना ?


- समीर गायकवाड.

Featured post

Lakshvedhi