Tuesday, 7 September 2021

 सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घ्या!

कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सर्वांनीच

जबाबदारीने वागण्याची गरज

माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 

        मुंबईदि. : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहेअसे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

            कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेत्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री, अमित देशमुखमुख्य सचिव सीताराम कुंटेआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यासवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजयराज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य सर्वश्रीडॉ. शशांक जोशीडॉ. राहुल पंडितडॉ. अजित देसाईबालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभुअमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्सनागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठीतर कारण स्पष्ट आहे. जगभरातील  देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहेआकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेलती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल टाकले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही परिषद त्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

            तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे  जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत,  तर डॉक्टरनर्सेसपोलीसअग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेतत्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थायंत्रसामग्रीऔषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

रुग्णालयांनी ऑडिट करून घेण्याचे आवाहन

            आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. आरोग्य सुविधा मग ते ऑक्सिजनरुग्णशय्याऔषधेव्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी या गोष्टींचे ऑडिट करून घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. 

 

प्रत्येक पाऊल सावधानतेनेमात्र अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची  घाई

            आजच्या शिक्षणदिनी शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करून कोरोनाने आपल्याला जे धडे शिकवले त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करून या संकटाचा बिमोड करायचा आहे. प्रत्येक पाऊल सावधानतेने आपण टाकतो आहे. ही सगळी काळजी घेतांना अनेकांना सगळ्या गोष्टी उघडण्याची  घाई आहे. पण आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या  कोरोनाच्या संकटातून  कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट

            महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या राज्याने केली असावी. पण आजही ऑक्सिजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज ३ हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहेत्यात काही वेळ जाणार आहे असे सांगून आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहेसव्वा लाख  ऑक्सिजन बेड वाढवले म्हणजे आपण  या सगळ्या रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज

            गेल्या अनुभवातून आपण काय शिकलो हे महत्त्वाचे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट आपल्यासाठी अधिक अडचणीची ठरली. आपली ऑक्सिजनची गरज अचानक वाढली. राज्याची ऑक्सिजनचे उत्पादन दररोज १२०० ते १३०० मे.टन असून ही गरज मागच्यावेळी १७०० ते १८०० मे.टन एवढी वाढली. इतर राज्यातून हजारो कि.मी. वरुन ऑक्सिजन आणावा लागलात्यातून आपण ऑक्सिजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सिजन मिळत नाहीतो ऑक्सिजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे. 

राज्यात १४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन

            आज १४०० मे.टन ऑक्सिजनचे उत्पादन राज्यात होत आहे. त्यात स्टील आणि लघु उद्योगासाठी ऑक्सिजन वापरतात. औषध क्षेत्रातलस तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मागच्यावेळी  सर्वच आपण ऑक्सिजन मेडिकल कारणासाठी वापरला म्हणजे इतर गोष्टींसाठी लागणारा ऑक्सिजन आपण बंद केला. आजही १४००  मे.टन ऑक्सिजन पैकी ३०० ते ३५० मे. टन ऑक्सिजन आपण रुग्णांसाठी वापरत आहोत. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. 

डेंग्यूमलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन

            माणूस आजारी पडला की सर्वप्रथम आपल्या फॅमिली डॉक्टरकडे माझा डॉक्टर’ या भावनेतून जातो. कारण त्यांचा या माझा डॉक्टरवर विश्वास असतो.  पावसाळा सुरु आहे. डेंग्युमलेरिया चा प्रादुर्भाव वाढत आहेत्याकडेही लक्ष देण्याची गरज असून कोविड नसला तरी डेंग्युमलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. लसीचे दोन्ही डोस घ्यापण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणीचारचौघात वावरतांना काळजी घ्यामास्क नक्की लावा. डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

कोरोनाविरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन

            राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारीत्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही नायाचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीहीआम्हीही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केले.

माझे गावमाझी जबाबदारी’ ओळखून कोरोनामुक्त गाव करा

            कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खुप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे तशीच माझे गाव माझी जबाबदारी’ ही गोष्ट ही महत्त्वाची आहे ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले. 

विक्रमी लसीकरणाबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक

            कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल एकाच दिवसात १२ लाख नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम केला असून त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे कौतुक केले. जसजशी लस उपलब्ध होईल तसे लसीकरण गतीने करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन

            आता सणवाराचे दिवस आहेतगेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतरगणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे हे सांगतानाच  नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी शासनाची सर्वतोपरी तयारी- मुख्य सचिव

            प्रास्ताविकात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वैद्यकीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोतप्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्य सचिवांनी सांगितले. गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये यावर भर देण्यात येत असल्याचेही श्री. कुंटे यांनी यावेळी सांगितले. 

            केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या उपचार मानकानुसार औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्यवैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफ़किनला सूचना दिल्या असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन ३ लाखांवर गेली आहेत्यात आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख ॲटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांसठी ४१० शासकीय आणि २०२ खाजगी प्रयोगशाळा कार्यन्वित असून रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त खाटा३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स बेड्सची तयारी प्रशासनाने केली आहे. राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून काल एकाच दिवशी १२ लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य सचिव श्री. सीताराम कुंटे यांनी केले. 

Monday, 6 September 2021

 महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस

एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता

 

            मुंबई दि. 6 पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील (क्लिनिकल सायकॉलॉजी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.

            भारतीय पुनर्वास परिषद यांनी दिलेल्या परवानगी विचारात घेऊन पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील (क्लिनिकल सायकॉलॉजी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 4 प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरु करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

            मा. सर्वोच्च न्यायालयकेंद्र शासनमा. उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनभारतीय पुनर्वास परिषद तसेच विद्यापीठाने एफ.फील(क्लिनिकल सायकॉलॉजी) या अभ्यासक्रमाबाबत वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक राहील. संस्थेने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशित करणे अनिवार्य असेल.

००००

 कामगार विकास आयुक्तांमार्फत असंघटित कामगारांना

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 6 राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या कामगारांना ई-श्रमित कार्ड मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार होण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत नोंदणी करण्यात येत आहे. राज्यातील अंदाजे 3.65 कोटी असंघटित कामगारांना ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन  कामगार विकास आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांनी केले आहे.

नोंदणीकरीता पात्रता :- असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 दरम्यानचा कामगार,      आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा.

नोंदणी कोठे करावी :- स्वत:, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र, eSHRAM Portal URL :  eshram.gov.in, नॅशनल हेल्पलाईन नंबर – 14434, टोल फ्री नंबर - 18001374150

            वरीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले निकष पूर्ण करण्यात आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. या नोंदणीकरीता नागरी सुविधा केंद्र / कामगार सुविधा केंद्रामार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

००००

 कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·       गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 

          मुंबईदि. 6 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

            आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलगृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारअपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्यायसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्तेमहामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेलपेणमहाड रस्ता,  साताराभुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्गमुंबई-गोवा महामार्गवाकण-पाली-खोपोली मार्गसिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्गआंबेनळी घाटताम्हिणी घाटरत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले.

            दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी श्री. शिंदे यांनी दिले.  मुंबई-पुणेपुणे-सातारामुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेशभक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.सार्वजनिक बांधकाम विभागरस्ते विकास महामंडळराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

            पथकर नाक्यांवर गणेशभक्तांशी वाद घालू नकापथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिकाजलद प्रतिसाद वाहनेजेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

कोकणात जाणाऱ्या मार्गावर पोलीस तैनात- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नयेवाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

            या बैठकीस ठाणेरायगडरत्नागिरीपुणेसिंधुदुर्गसाताराकोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीजिल्हा पोलीस अधिक्षकसार्वजनिक बांधकाम विभागराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपरिवहनएसटी महामंडळमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होतेत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली.

००००

 अंकनाद स्पर्धेतून मुलांच्या प्रतिभेला वाव

- सुभाष देसाई

·       राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

            मुंबईदि. 6 : राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडला. यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित या उपस्थित होत्या. 

            शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील 7 गटातील प्रातिनिधिक 7 विजेत्यांना श्री.देसाई यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

            या स्पर्धेसाठी राज्यभरातून 1382 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्याना प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये 11 हजार7 हजार,  5 हजार अशी पहिल्या 3 क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे पारितोषिके म्हणून देण्यात आली.

            भारतीय संस्कृतीतील चांगल्या परंतु काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा देण्याचा प्रयत्न अंकनाद पाढे स्पर्धेतून होत आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमांतून मराठी भाषेचे वैभव पुढे येत असल्याने शासन अशा उपक्रमास प्रोत्साहन देत आहे. गणितासारखा भीती वाटणारा विषय अंकनादच्या उपक्रमातून नादमधूर होत आहे. गणिताच्या वाटेला जे जात नाहीतत्यांनाही हा प्रवास आवडायला लागेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळेलअसे मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले.

            अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, ' ताल,  नाद याबरोबर गणिताचा प्रवास पुढे जात आहे,  हे महत्वाचे आहे. यशस्वी व्हायचे असेल तर पाढयांना पर्याय नाही. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय या शासनाने घेतला ही राज्यासाठी महत्वाची बाब आहे.

            पारितोषिक विजेते :  स्वराज कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  बाल गट ),  कैवल्य खेडेकर ( प्रथम क्रमांकइयत्ता दुसरी-तिसरी गट)शाश्वत कुलकर्णी (द्वितीय क्रमांकइयत्ता दुसरी- तिसरी गट ),  सृष्टी कुलकर्णी ( प्रथम क्रमांक,  इयत्ता सहावी सातवी गट )दामोदर चौधरी (द्वितीय क्रमांक,  इयत्ता सहावी-सातवी गट )कृतीका किणीकर ( प्रथम  क्रमांकइयत्ता आठवी ते दहावी गट ),  दामोदर चौधरी ( प्रथम,  खुला गट ) यांना गौरविण्यात आले.

            यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादेमॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशीसंचालक पराग गाडगीळमराठी काका उर्फ अनिल गोरेसमीर बापट,  निर्मिती नामजोशी,  वैशाली लोखंडेरसिका सुतार,  पार्थ नामजोशी उपस्थित होते

 गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीयधार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष - संघटनांना कळकळीचे आवाहन

·        जनतेचे आरोग्य महत्वाचेउत्सव नंतरही साजरे करू

·        कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

 

            मुंबई, दि. :  कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेतामी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो कीत्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रमसभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकतामात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाहीजनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्याअसे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

            राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतचपण सत्ताधारीविरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे कीआता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सणउत्सव आले आहेतत्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेलपण शेवटी आपले आरोग्यप्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणतात की, 'हे उघडा ते उघडाया मागण्या ठीक आहेतपण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहेआपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सणउत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतीलपण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तरशासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहागर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभासंमेलनांना उत्तेजन देऊ नकाहीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल.

            मला वारंवार आपणांस  हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहेकारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहेअसेही मुख्यमंत्री म्हणतात.

            दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

            महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हेकोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केलीय. अमेरिकेत तिसऱ्या लाटेने जीवन अस्ताव्यस्त केले. चीनही विळख्यात सापडलाय. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३०,००० नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाहीतर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.  सरकार सुविधा निर्माण करीलपण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असेही मुख्यमंत्री आवाहनात म्हणतात.

0000

 परवा चर्चा करताना आई म्हणाली, 

अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न 

पीताही दारु पिल्याचा अभिनय किती 

सुरेख करतात.


आता आईला कोण सांगणार --- 

दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय

 करण्यापेक्षा, 


दारु पिऊन, न पिल्याचा अभिनय करण किती अवघड असते ते ! 


 अखिल भारतीय श्रावण संपल्यावर बसू संघटना 😂😂😂😁😁😁😃😃

Featured post

Lakshvedhi