Friday, 3 September 2021

 *...दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...🙌*

*...जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?*

*...शेवटी काय.!*

*...हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा..😊*

         *🌹💞 💞🌹

  🌾🍁 *शुभ सकाळ*🍁🌾

 राजमाता जिजाऊंचं " पाचाड ".....


पाचाड गावाला यापेक्षा वेगळी ओळखच नसावी ....कारण ज्या महाराष्ट्रकन्येने जिथं अखेरचा श्वास घेतला त्या पावनपवित्र भूमीत राहणारे भाग्यवान .....जितका मान श्रीरायगडाला , तितकाच सन्मान आपल्या पाचाडभूमीला......


पाचाड शब्दाची सरळसोपी व्याख्या पाच आड ......आजही होळकरबाव , तक्क्याची विहीर , आणखी एक पाचाड कोटातील विहीर , अशा पाच सहा विहीरींचं गाव म्हणजे पाचाड.....खरं म्हणजे हे गाव अश्मयुगीन कालखंडातील असल्याची खूण म्हणजे वाघबीळात सापडलेली दगडी हत्यारे.......ज्या वाघबीळाला ब्रिटिशांनी " गन्स ऑफ पाचाड " असंही संबोधलं होतं.......पाचाडहून रायगडाकडे जाताना खिंडीत 5 ते 7 लाख वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन मानवांचं निवासस्थान असलेली ही गुहा तीन तोंडाची आहे ......नैसर्गिक सुरक्षा लाभल्याने शिवकाळात टेहळणीची चौकी म्हणून वापर केला जात असे......


वाघबीळाकडून पुन्हा पाचाडच्या दिशेने येताना , उजवीकडे " नकट्याचा माळ " पाहायला मिळतो .....तिथं भग्न शिवपिंडी , दोणी , देवदेवतांच्या मूर्ती, आहेत.....नकट्याच्या माळाबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते ......छत्रपती संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर अटक करायला जाताना , कटकारस्थानी मंत्र्यांनी एका पाईकाला आज्ञा दिली कि जर यदाकदाचित शंभूराजे रायगडी आलेच तर त्यांना गडावर जाण्यापासून रोखायचे ......याचवेळी छत्रपती शंभूराजे या माळाच्या ठिकाणी पोहोचताच त्या आज्ञाधारक सैनिकाने त्यांना अडवले .....राग अनावर होऊन त्या पाईकाचे नाक कापल्याने त्या जागेला आजही " नकट्याचा माळ " असे बोलले जाते......एक अनामिक वीराचा समाधी चौथराही तिथं पाहायला मिळतो.....


आत्ताच्या देशमुख हाॅटेलसमोर पायर्यांची विहीर जिला " होळकरबाव " असं बोलले जाते......पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात अनेक गावामध्ये बारव  म्हणजेच बांधीव विहिरी बांधण्यात आल्या....त्यापैकी ही इंग्रजी " L " आकाराची विहीर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.......शेडगे उपहारगृहाच्या शेजारी एक हनुमान मंदिर आहे.....शिवकाळातील वेशीवरचा मारूती आहे तो......कारण जिजाऊंचा वाडा , बौध्दवाडी आणि मूळ पाचाड गावाची वेस इथं आहे.....परंतु आत्ता हाॅटेल , दुकानं आणि नवीन घरांच्या गर्दीत " वेशीवरचा मारूती " मात्र दुर्लक्षित झालाय.......पाचाडचं शेडगे घराण्यातील व्यक्ति बंजरंगबलीची पूजा करतात.....


पाचाड गावातील राजमाता जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे पाचाडचं वैभव ......तसा तो भुईकोट किल्लाच ....एक हेक्टर जमीनीत दक्षिणोत्तर पसरलेल्या वाड्यात चार पाच वर्षे वास्तव्य होतं......रायगडावरील थंड बोचरी हवा जिजाऊंना सोसत नव्हती म्हणून महाराजांनी बांधलेला हा वाडा.....तीनदा हा कोट उध्वस्त केला गेला तरीही त्याचं मराठेशाहीतील रूप मनात भरतं......हवालदाराची चौकी , सबनीसाचा घरटा , राजसदर , दस्तुरखुद्द जिजाऊंचं निवाससस्थान , लोडबाव , पश्चिमेला असलेली पागा , तलाव , हे सारं आजही पाहता येतं.......छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर अवघ्या  अकरा दिवसांनी जिजाऊंना इथंच देह ठेवला.......कधीही इथं गेलात तर सदरेच्या मागे असलेल्या भव्य इमारतीच्या चौथर्यावर अनवाणी जा ....तिथलं पावित्र्य राखा.....जमलंच तर तिथली माती कपाळी लावा......काही शतकांपूर्वी आमच्या छत्रपतींची माऊली तिथं विसावली आहे.......मावळेहो मुजरा करा .....


" जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ! भली शोभली ज्यास जाया जिजाई " असं जयराम पिंडे या कविने ज्यांचं वर्णन केलं आहे त्या राष्ट्रमातेचं स्मारक वृंदावनही याच पाचाड मध्ये आहे ......या स्मारक वृंदावनाच्या समोरील भागात भग्न शिवमंदिराचे अवशेष दिसतात......शिवपिंडी , नागशिळा , गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते......या स्मारकाच्या पिछाडीपासून ते थेट कोंझर रस्त्यापर्यत जो परिसर आहे त्याला स्थानिक लोक " घोडधाव " म्हणतात......शिवकाळात साधारण दहा हजारांचं घोडदळ , पायदळ या परिसरात सज्ज असायचं  ......


पाचाडचं ग्रामदैवत श्री सोमजाई ......शिवकाळापासून या देवतेला मान आहे .....मंदिरासमोर काही समाधीशिळा आहेत.......मराठा कालखंडातील कुणा तोलामोलाच्या सरदारांची स्मारकशिळा असावी असा अंदाज करता येतो......


पाचाड गावात घाडगे , कदम , पवार , शेडगे , पाचाडकर , गायकवाड,  मुजावर , या आडनावाची कुटुंब राहतात......शेडगे घराण्याकडे पाचाडच्या भुईकोटाचं कारभारी पद होतं......श्रीपती शेडगे , तुकाराम शेडगे आणि आत्ता आमचा मित्र मंगेश शेडगे अशा कित्येक पिढ्या रायगडच्या सेवेत रूजू आहेत......पाचाड मध्ये पेठ असल्याचाही उल्लेख कागदपत्रांत सापडतो.......पेशवेकाळात गुजर वाणी इथं स्थायिक झाल्याची नोंद सापडते.......


पाचाडातून कोंझरगावाकडे जाताना , डावीकडे एक चौथरा लक्ष वेधून घेतो.....हीच ती मालसावंताची चौकी......गोवेलेच्या मालसावंतानी महाराजांशी एकनिष्ठेने स्वराज्यकार्य केले .....याच चौकीपासून पश्चिमेकडील शेताच्या बांधाबांधावरून गेल्यानंतर एका ओहोळाच्या शेजारी अतिशय सुबक , भव्य अशी समाधी दिसते......हीच ती सावंताची समाधी .....इतक्या आडरानामध्ये अशी नक्षीकाम केलेली समाधी कशी असू शकते हा प्रश्न  आपल्याला पडतो.......रायगडाला जाणारे शेकडा 90 टक्के शिवभक्त हे पाहत नाहीत......समाधीच्या शेजारीच भव्य जोते आणि शिवपिंड दिसते.....शिवकाळातील त्या भव्य जोत्यावरून चौकीपहारा किती महत्त्वाचा होतो हे लक्षात येतं.......यालाच सावंताचं मेट असंही बोललं जातं......पाचाडच्या या परिसरात पूर्वी अन्नछत्रही चालत असे......


असं हे ऐतिहासिक पाचाड अनुभवण्यासाठी तिथला कानाकोपरा कधीतरी भटकंती करा.....नाचणटेपाची गुहा , होळकरबाव , पाचाडचा भुईकोट , वेशीवरचा मारूती , नकट्याचा माळ , सावंतांचं मेट , सगळं याची देही याची डोळा नजरेत सामावून घ्या.......



शब्दांकन - रामजी कदम 

माणगाव रायगड

 [02/09, 12:29] B Vaishali: *गंमत*


आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी 

इत्यादी घरी करून पाहिले जातात 


आणि 


कुरडई  पापड, लोणची 

विकत घेतात..!

😂😂🤥🤥


*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,

घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜


*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.


       आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.


आहे की नाही गंमत 😜 😜 🤪🤐😷

[02/09, 13:13] B Vaishali: जगातले सगळे रेकॉर्ड 

तुटले ,

जेंव्हा होमीओपॅथी

डॉक्टरच्या बायकोने 

" फोन "

करुन मिस्टरांना सांगीतले की


"घरातला साबुदाणा संपलाय

येताना क्लिनीक मधला 

थोडासा घेऊन या"

😃😃😃😃😃😃😃

 [02/09, 12:26] B Vaishali: *"कात्रीची" धार गेली तर कापड एकवेळ कापलं जात नाही पण "खात्रीची" धार गेली की "नातं" मात्र हमखास कापलं जातं.*                                                  

*अपयश हे संध्याकाळी विसरून* 

*जायचे असते  कारण*

*उद्याची येणारी सकाळ*

*ही तुम्हाला एक नवीन संधी असते* 

*यशापर्यंत पोहचण्याची …*


🙏🙏 शुभ  सकाळ 🙏🙏

 ( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ! )


*मानवी शरीर अदभुत आहे.*


*मजबुत फुफ्फुस :-*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. 

जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल.


*अशी कोणतीही फॅक्टरी नाही :-*

आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड, नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जां पेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन / नाश  होते. शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका सतत असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.


*लाखो किलोमीटर चा प्रवास :-*

मानवाचे रक्त शरिरात दररोज १'९२'००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारणपणे  ५.६ लिटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा,  संपूर्ण शरीराचे भ्रमण करते.


*धडधड :-*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १'००'००० वेळा घडकतं !  वर्षभरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयाच्या पंम्पिंग चा  दाब एवढा जास्त असतो की, रक्ताची चिळकांडी ३० फूट वर उडू शकते !


*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ :-*


मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून, लहानातला लहान फरक ओळखू शकतात. अजुनपर्यंत जगात अशी कोणतीही मशिन नाही, जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 


*नाकात एअर कंडीशनर :-*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.


*ताशी ४०० कि.मी ची गती :-*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी गतीने तडक उपयुक्त सूचनांच प्रसारण करतं. 

मानवाच्या मेंदुत १०० अब्जांपेक्षा जास्त नर्व्हस् सेल्स आहेत.


*जबरदस्त मिश्रण :-*

शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकेल आणि सिलिकोन आहे.


*अजब शिंक :-*

काय करेल मास्क (मुस्क) . . .

शिंकतांना बाहेर येणारी हवेची गती, प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी पर्यंत असू शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.


*बेक्टेरियांचे गोदाम :-*

मानवाच्या शरीराच्या १० %  वजन हे, शरीरात असलेल्या बेक्टेरियांचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरिया असतात.

( साबन, सेनिटायजर, किंवा केमिकल अपायकारक ! )


*विचित्र विश्व :-*

डोळ्यांचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो. कान १'००० ते ५०'००० हर्टज आवाजांना ओळखू शकतो.


*दातांची काळजी घ्या :-*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात पण,  जसे शरीराचे अन्य भाग स्वत: ची काळजी स्वत: च घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वत: ची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.


*तोंडातली लाळ :-*

मानवाच्या तोंडात दररोज *१.७  लिटर* लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेल्या १०'००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते.


*पापण्या झपकणे :-*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की,  पापण्या झपकल्यास कचरा निघतो, यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.


*नखांचे वेगळेपण :-*


अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.


*दाढीचे केस :-*

पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर,  ती ३० फूट लांब होवू शकते.


*जेवणाचे गणित :-*

व्यक्ती सामान्यरीत्या जेवणासाठी एकूण ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७'००० पट जेवण खाल्लेलं असतं !


*स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच, आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करते. 

*वसंत ऋतुमध्ये* बाळाचा विकास वेगाने होतो.


*झोपेचे महत्व :-*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपूर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणि डागडुजीचे ( रिपेरिंग ) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे आवश्यक होर्मोन्स मुक्त होतात.


*तेंव्हा तुमच्या किंमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका !*


*म्हणून निसर्गाचे ( नियतीचे )  दिवसात ३ वेळा, आभार म्हणून, आठवण करा.*

*सकाळी उठतांना, जेवतांना, रात्री झोपतांना.*



*🌹मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धिचे कारण...*🙏

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर

एसटी महामंडळाला 500 कोटी तातडीने वितरित

 

            मुंबईदि. 2 :- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

            कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला.

०००००


Thursday, 2 September 2021

 कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता

कृषी क्षेत्रात क्रांती आणावी

- राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 2 : भारत अन्नधान्य उत्पादनदुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेतीपेटेंटभौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अश्यावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावेअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झालात्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी व कृषीवर आधारित उद्योगफलोत्पादन यांमुळे देश संपन्न आहे. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले. नंतरच्या काळात हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात धवल क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. उत्तम खेतीमध्यम बाननिकृष्ट चाकरीभीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.   

            कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

            भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

            यावेळी कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. 

            दीक्षांत समारोपात एकुण २०८७ स्नातकांना पदवीपदविकापदव्युत्तर व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi