Thursday, 2 September 2021

 कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी

टास्क फोर्सची माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकिय परिषद

·       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार उद्घाटन

·       राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी

·       समाज माध्यमातून प्रसारणचर्चा सर्वांना पाहता येणार

 

            मुंबईदि. 1 :- कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणारअसून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  उपस्थित राहणार आहेत.

            रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणारी परिषद समाजमाध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्सवैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

            या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे.

            या परिषदेसाठी www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.

            परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ राहूल पंडितडॉ शशांक जोशीडॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभूतसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेसार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.

            ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटरफेसबुक व युट्युब https://youtube.com/c/CMOMaharashtra वरुन देखील पाहता येईल.

००००

 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात 24 लाख लाभार्थ्यांची नोंद;

सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक निधीचे लाभार्थ्यांना वितरण

 

 

 

            मुंबईदि. 1 : माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आले आहेअसे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार ५५२ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून सन २०२१-२२ या वर्षातील नोंदणी उद्दिष्टाचे हे प्रमाण ९२ टक्के आहे. सर्वाधिक १०१ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झालेली असून तिथे २ लाख ८ हजार १६६ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.  राज्यातील सर्व नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांसाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जिवीत अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून ५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.  पात्र गर्भवती महिलेस ३ टप्प्यात डीबीटीद्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.

            मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा केला जातो तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीओपीव्हीडिपीटी आणि हिपॅटॅटीस व तसेच पेन्टाव्हॅलेन्ट च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.

            प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती/एएनएम/अंगणवाडी कार्यकर्ती यांचेकडे सर्व आवश्यक कागदपत्रे देवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल

            देशात दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिणामी देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते. माता व बालमृत्यू दरावर नियंत्रण ठेवून हा दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरु केली आहे. या योजनेंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावीजन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी

राज्य वातावरणीय बदल परिषद

            इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहअध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचे देखील ठरले.

            सदर अहवालातील नमूद केलेल्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठीसंयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेले ५R (Reduce, Refuse, Reuse, Recycle, Recover) नुसार राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र हा उष्ण कटीबंध प्रदेशात येतो.  वातावरणात 2 ते 2.5 अंश डिग्री तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आयपीसीसीच्या अहवालात भारतातील १२ शहरांतील सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.  याशिवाय अर्बन हिट आयलंड इफेक्टभूसख्खलन असे देखील परिणाम होऊ शकतात. आज वातावरण बदलाचा राज्याचा कालबद्ध कृती आराखडा असावा तसेच यासाठी यामध्ये वातावरणीय बदलाशी संबंधित सर्व मंत्र्यांचा समावेश करावा असे मंत्रिमंडळास सादर करण्यात आले.

मूल्यांकन अहवाल 6 (AR६) म्हणजे काय?

            दर काही वर्षांनी आयपीसीसी ही संस्था वातावरण बदलावरील घडामोडींवर अहवाल प्रकाशित करते. आत्ता पर्यंत असे ६ अहवाल प्रकाशित झाले असून या आहावालांसाठी जगभरातून अनेक वैज्ञानिक योगदान देतात.

दृष्टीक्षेपात अहवाल

            नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालाप्रमाणेआपली पृथ्वीचे तापमान औद्योगिक काळापेक्षा 1.1°C  ने वाढले आहे. 

 न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबवावी

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 1 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी पुरवठ्याच्या विविध नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी जुन्या योजना प्रभावीपणे सुरु ठेवण्यात याव्यात. न्हावा-शेवा योजना टप्पा 2 जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.

            रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या पाणी पुरवठा केंद्रासंदर्भात आढावा बैठक पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चालू असलेल्या पाणी पुरवठा केंद्राकडून

जास्तीत जास्त लोकांना पाणीपुरवठा होईल असे नियोजन करावे

            श्री. बनसोडे म्हणाले कीनवी मुंबईपनवेल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शहरीकरणात वाढ होत आहे. या भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असून नवीन पाणी पुरवठा योजना जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. सध्या कार्यान्वित असलेल्या जुन्या पाणी पुरवठा योजना जास्तीत जास्त क्षमतेने सुरु ठेवाव्यात जेणेकरुन नागरिकांना पाणी पुरवठा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

            वाढीव न्हावा - शेवा पाणी पुरवठा योजनामाथेरान सुधार व वाढीव पाणी पुरवठा योजनावाढीव न्हावा-शेवा पाणी पुरवठा योजना टप्पा योजनांबाबतचा आढावा यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलव्यवस्थापन केंद्रे जास्तीत जास्त क्षमतेने चालवून शक्य तितक्या ग्राहकांना पाणी पुरवठा करावा जेणेकरुन नागरिकांनाही सुविधा उपलब्ध व्हावी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या महसुलातही वाढ व्हावी, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.

००००

 1971 च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त

स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

·       गेट-वे-ऑफ इंडिया येथे कार्यक्रम

 

            मुंबईदि. 1 : भारताने 1971 मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या स्वर्णिम विजय मशालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट-वे-ऑफ इंडिया येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. ही मशाल दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करुन मुंबईत दाखल झाली.

            यावेळी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, एअर व्हॉईस मार्शल एस.आर. सिंग, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हॉईस ॲडमिरल आर.हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.

            भारताने पाकिस्तानला 1971च्या युद्धात नमवले होते. या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशभर स्वर्णिम विजय वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त स्वर्णिम विजय मशालीची देशभर परिक्रमा सुरु आहे. या स्वर्णिम विजय मशालीचे 1 सप्टेंबर रोजी मुंबईत आगमन झाले.

             सन 1971च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या चक्र पुरस्कारार्थी ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास, ॲडमिरल विजयसिंग शेखावत, विंग कमांडर दिनेशचंद्र नायर, नायक धोंडिराम बनसोडे, वीरपत्नी श्रीमती सेलडा डायस यांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भारतीय लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

00000

 वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्व संचालनालय आणि

बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पुढाकार

 

            मुंबईदि. 1 : वरळी किल्ला व परिसर विकास पुरातत्व संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तरित्या करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी  पुढाकार घेतला आहे.

            वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेपाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडेसांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरातपुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळेसहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले कीवरळी किल्ला व परिसर विकासासाठी पुढील १० वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिका सांस्कृतिक कार्य विभागासोबत काम करणार आहे. वरळी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून हा किल्ला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.

            पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले कीराज्यासह मुंबईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात येईल. तसेच या किल्ल्यावर विद्युतीकरण व प्रकाशझोत योजनेचे काम करण्यात येईलअसे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

0000

 पोषण माहमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच

निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            मुंबईदि. 1 : कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतुकेवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार कराअसे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

            राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदनएकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) आयुक्त रुबल अग्रवालराजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधवआयसीडीएसचे उपायुक्त गोकुळ देवरेसहायक आयुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारीबालविकास प्रकल्प अधिकारीअंगणवाडी पर्यवेक्षिकाअंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

            कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर आपल्याला मात करायची आहेअसे सांगून महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्यापोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकासेविकामदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषदपंचायत समित्यांचे पदाधिकारीसरपंचग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.

            ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्याशून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी राजमाता जिजाऊ मिशनच्या सहयोगातून तयार केलेले स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल.

            आदिवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेलअसे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

            प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहेअसेही त्या म्हणाल्या. कोविड- 19 च्या काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले. अनंत अडचणींवर मात करतदुर्गम भागातकाही ठिकाणी नावेतून जात पोषण आहार पुरवला आहे. आताही अशाच प्रकारे आपल्याला काम करायचे आहे. कोविडचा धोका टाळून हे काम सुरक्षितरित्या करण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकसेविकामदतनीस यांचे  शंभर टक्के कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

            यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन म्हणाल्यातीव्र कुपोषित बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यापर्यंत आयसीडीएसच्या सेवा पोहचवण्यासाठी आणि कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. गडचिरोली मध्ये 100 अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणारा शालेयपूर्व शिक्षणाच्या तितली प्रकल्पातील उपयुक्त बाबींचा आकार’ अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. पोषण माहमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येबरोबच त्यांची गुणवत्ताही उत्कृष्ट असली पाहिजेअसेही त्या म्हणाल्या.

            श्रीमती अग्रवाल म्हणाल्यापोषण माहमध्ये ॲनिमियामुक्त भारतबाळाचे पहिले 1 हजार दिवसकुपोषण मुक्तीगरोदरपणातील काळजीपोषण-सुपोषण यावर वेबिनारनिबंध स्पर्धा यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. परसबागा अर्थात पोषण वाटिकांची निर्मितीयोगापोषण सामुग्रीचे वाटपसॅम बालकांचा शोध आणि पोषण आहार व इतर मदत उपलब्ध करुन देणेया प्रमुख संकल्पना पोषण माहमध्ये राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहेअशी माहिती त्यांनी दिली.

            या कार्यक्रमादरम्यान मायग्रेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटनतितली प्रकल्पाचे उद्घाटनकेंद्र शासनाच्या पोषण ज्ञान पोर्टलवर एक घास मायेचा’ या राज्याच्या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पाककृतींच्या चित्रफीती अपलोड करण्याचा शुभारंभसंपर्क संस्थेमार्फत ऑनलाईन पाककृती स्पर्धांचे प्रदर्शन आणि उद्घाटन करण्यात आले. माता बाल पोषणाची शिदोरी उपक्रमाची ऑनलाईन चित्रफीतीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटनकोविड काळात अंगणवाड्यांनी केलेल्या कामाबाबतचा अभ्यास अहवालबाल कल्याण समितीच्या कार्य अभ्यास अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

००००

Featured post

Lakshvedhi