Thursday, 2 September 2021

 पोषण माहमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याबरोबच

निरंतर प्रयत्नांद्वारे कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

            मुंबईदि. 1 : कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा. परंतुकेवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार कराअसे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

            राष्ट्रीय पोषण महिन्याचा राज्यातील शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदनएकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) आयुक्त रुबल अग्रवालराजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानचे संचालक संजीव जाधवआयसीडीएसचे उपायुक्त गोकुळ देवरेसहायक आयुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा कार्यक्रम अधिकारीबालविकास प्रकल्प अधिकारीअंगणवाडी पर्यवेक्षिकाअंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

            कुपोषण ही एक गंभीर समस्या असून त्यावर आपल्याला मात करायची आहेअसे सांगून महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्यापोषण महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकासेविकामदतनीस यांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी ज्यामध्ये जिल्हा परिषदपंचायत समित्यांचे पदाधिकारीसरपंचग्रामपंचायत सदस्य आदी लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सहभागी करुन घ्यावे. कोविडचे नियम पाळून जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आणि लोकसहभाग वाढवून पोषण माहमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवावा.

            ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्याशून्य ते 6 वर्ष वयोगटातील बालके असलेल्या स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांवर लक्ष ठेवायचे असून त्यामधील लहान बालकांना स्थलांतराच्या नवीन ठिकाणी पूरक पोषण आहार सुलभतेने मिळेल या बाबीची खात्री करावी लागेल. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी राजमाता जिजाऊ मिशनच्या सहयोगातून तयार केलेले स्थलांतरित लाभार्थ्यांसाठीचे मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल.

            आदिवासी भागामधील कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांमधील पोषक तत्त्वांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच या भाज्यांच्या उत्तम पाककृतींचा समावेश रोजच्या आहारात करणे उपयुक्त ठरेलअसे मत अॅड. ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले.

            प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपूर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहेअसेही त्या म्हणाल्या. कोविड- 19 च्या काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केले. अनंत अडचणींवर मात करतदुर्गम भागातकाही ठिकाणी नावेतून जात पोषण आहार पुरवला आहे. आताही अशाच प्रकारे आपल्याला काम करायचे आहे. कोविडचा धोका टाळून हे काम सुरक्षितरित्या करण्यासाठी राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकसेविकामदतनीस यांचे  शंभर टक्के कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

            यावेळी प्रधान सचिव श्रीमती कुंदन म्हणाल्यातीव्र कुपोषित बालकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यापर्यंत आयसीडीएसच्या सेवा पोहचवण्यासाठी आणि कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. गडचिरोली मध्ये 100 अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणारा शालेयपूर्व शिक्षणाच्या तितली प्रकल्पातील उपयुक्त बाबींचा आकार’ अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. पोषण माहमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येबरोबच त्यांची गुणवत्ताही उत्कृष्ट असली पाहिजेअसेही त्या म्हणाल्या.

            श्रीमती अग्रवाल म्हणाल्यापोषण माहमध्ये ॲनिमियामुक्त भारतबाळाचे पहिले 1 हजार दिवसकुपोषण मुक्तीगरोदरपणातील काळजीपोषण-सुपोषण यावर वेबिनारनिबंध स्पर्धा यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. परसबागा अर्थात पोषण वाटिकांची निर्मितीयोगापोषण सामुग्रीचे वाटपसॅम बालकांचा शोध आणि पोषण आहार व इतर मदत उपलब्ध करुन देणेया प्रमुख संकल्पना पोषण माहमध्ये राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहेअशी माहिती त्यांनी दिली.

            या कार्यक्रमादरम्यान मायग्रेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटनतितली प्रकल्पाचे उद्घाटनकेंद्र शासनाच्या पोषण ज्ञान पोर्टलवर एक घास मायेचा’ या राज्याच्या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पाककृतींच्या चित्रफीती अपलोड करण्याचा शुभारंभसंपर्क संस्थेमार्फत ऑनलाईन पाककृती स्पर्धांचे प्रदर्शन आणि उद्घाटन करण्यात आले. माता बाल पोषणाची शिदोरी उपक्रमाची ऑनलाईन चित्रफीतीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटनकोविड काळात अंगणवाड्यांनी केलेल्या कामाबाबतचा अभ्यास अहवालबाल कल्याण समितीच्या कार्य अभ्यास अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi