Monday, 30 August 2021

 प्र.के.अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले...

ही टीका तालिबानी वृत्ती पेक्षाही वाईट होती. 

तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही.

त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,

" माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात

असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला,

व त्यात तिचा गर्भपात  झाला ...

आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले ..."


यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले , 

ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला...!


मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.

त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली,

पश्चाताप केला आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले...!


ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती...!


ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ..??🤔


आजची संस्कृती म्हणजे ....,

तुला चप्पलने मारतो ...,

कानशिलात मारतो ...,

कोथळा काढतो....,

राडा...,

ही आहे...!


आता हा राडा पुढे न्यायचा ...?

का यशवंतराव - अत्रे यांची नीती पुढे न्यायची...??

हे आपल्या युवकांच्या  हातात आहे...!!

 कोरोना काळातील एकल/विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय  समाधान शिबीर’ घ्यावे

-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

·       जिल्हा उपसमिती स्थापन करण्याचेही निर्देश

 

            मुंबईदि. 30 : कोरोना महामारीमुळे घरातील कर्ता पुरुष दगावलेल्या एकल / विधवा महिलांच्या आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी कागदपत्रांच्या औपचारिक पूर्ततेसाठी  जिल्ह्यात समाधान शिबीर’ आयोजित करुन अडीअडचणी सोडवाव्या तसेच टास्क फोर्स समिती अंतर्गत जिल्हा उपसमिती स्थापन करुन त्या समितीत स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            महिलांना समाजात योग्य मान मिळावा यासाठी डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली  कोरोनामध्ये  एकल / विधवा महिलांच्या पुनर्वसनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे सामाजिक संस्थांची बैठक झाली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव महेश वरुडकरएकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णीजयाजी पाईकरावविदर्भ विभागाच्या सामाजिक संस्था प्रतिनिधी सुजाता भोंगाडेअंबेजोगाई हून पंचशीला ओव्हाळपुण्यातून ॲड.असुंता पारधेकोल्हापुरातून  प्रकाश गाताडे,अशोक कुटेबाजीराव ढाकणे, बीडयांच्यासह अनेक  सामाजिक कार्यकर्ते ऑनलाइन उपस्थित होते.

             उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याकोरोना महामारीमुळे एकल / विधवा झालेल्या महिला आणि अनाथ बालकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एकल / विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेद्वारे मिळणारी मदत,अडीअडचणी सोडविणेमालमत्ता प्रकरणे निकाली काढणेमहामंडळांच्या योजनांतून मदत देणेआर्थिक समस्या सोडविणेव्यावसायिक प्रशिक्षण देवून महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे अशा उपायायोजना करण्यासाठी जिल्ह्यात समाधान शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांचा समावेश करुन महिलांना शासकीय मदतीची प्रकरणे छाननी करून त्यांनी मदतीचा लाभ दिला जाणे आवश्यक आहे. कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होवून एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावायासाठी राबविण्यात येणारी मिशन वात्सल्य’ योजना अत्यंत  चांगली असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सर्वेक्षण टप्पेनिहाय करावे

             एकल / विधवा महिलांचे सर्वेक्षण शासनस्तरावरून 1 मे पासून सुरु झाले आहे. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक महिलेच्या गरजांबाबतही पडताळणी केली जात आहे. कोविड काळात सर्वेक्षण सुरुच राहणार असून महिलांची संपूर्ण आकडेवारी मिळविण्यासाठी सर्वेक्षणाचे टप्पे ठरवावे लागतील. त्यानुसार माहिती गोळा करुन आवश्यक उपाययोजना शासनाने राबवाव्यात.

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहणार

            केंद्र सरकारच्या माध्यमातून एकल/ विधवा महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहणार असल्याची माहिती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसेच देशातील विविध राज्यांनी या स्वयंसिद्धा महिलांसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहितीही घ्यावी लागणार आहे. तसेच  लोकसभेतील  लोकप्रतिनीधींमार्फत केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेली माहिती राज्यसरकारला पुरविण्‍याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील महामंडळांसमवेत बैठक घेणार

            कोरोना महामारीमुळे अनेक महामंडळांचे कामकाज थांबले होते ते आता सुरु झाले आहे. राज्यशासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळमहात्मा जोतिबा फुले मागासवर्गीय महामंडळ,  अण्णाभाऊ साठे विकास महामंडळअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांचेमार्फत एकल/ विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्‍यासाठी या सर्व महामंडळासमवेत लवकरात लवकर बैठक घेणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

फसवणूक टाळा

            विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचासंस्थांचा वापर करुन अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अशा गैरप्रकाराला बळी न पडता शासकीय यंत्रणेमार्फतच योजनांसाठी अर्ज करुन स्वत: ची फसवणूक टाळण्याचे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले.

००००


 ८.८९ टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, २०२१ ची परतफेड

 

             मुंबई,दि.30 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.८९ टक्के कर्जरोखे २०२१ ची परतफेड दि.५ ऑक्टोंबर २०२१ रोजी पर्यंत आहे असे पत्रक वित्त विभागातर्फे प्रसिध्दीस देण्यात आले आहे.

            महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचना क्र. एलएनएफ-१०,११/प्र.क्र.२/अर्थोपाय दि. ३० सप्टेंबर २०११ अनुसार ८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि.४ ऑक्टोंबर२०२१ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. ५ ऑक्टोंबर२०२१ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी  जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ०५ ऑक्टोंबर २०२१ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान है,इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

         तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी८.८९% महाराष्ट्र शासन कर्जरोखे२०२१ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत:

                                 " प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली."

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित) बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल,त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा प्रधान सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

0000

 

 खादीग्रामोद्योग महामंडळाच्या स्वप्नांचे कौतुक’ कॉफीटेबल बूक,

लघुपटाचे प्रकाशन

 

          मुंबई, 30 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'स्वप्नांचे कौतुकया कॉफी टेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप उपस्थित होते.

          राज्यातील खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांमधून यशस्वीपणे रोजगार निर्माण करणाऱ्या ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा या कॉफीटेबल बूकमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसायबरोबर हस्तकलानिसर्गपूरक व्यवसाय आदी ग्रामोद्योगांनी यशस्वीरित्या उभारलेले उद्योग हे नव तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरतीलअसा आशावाद श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

           ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावातसेच त्यांचे स्थलांतर थांबावे आणि ग्रामीण भागातच कामयस्वरुपी उद्योग उभा रहावा हे मंडळाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

          पुणे हातकागद संस्थेने तयार केलेले फोल्डर्सडायरी व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे श्री. देसाई यांनी अनावरण केले.

००००


 धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करावे

                              - अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

 

          मुंबईदि.३०: धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

           पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारेमहाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

         अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणालेधानाची प्रतवारी व इतर बाबींसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल.या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई  करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते.ऑनलाईन सातबारा,बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे,धानाची गुणवत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे,धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे.याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अंमलबजावणी केली जावी.

         श्री.भुजबळ म्हणालेधान खरेदी केंद्राबाबत स्थानिक यंत्रणांनी समन्वयानी काम करावे.धान खरेदी केंद्रावर कर्मचारी,ग्रेडर,वजन काटे,धान साठवणूकीसाठी गोदामे,मॉइश्च मिटर या सर्व बाबीं उपलब्ध आहेत का याचीही तपासणीही केली जावी.फक्त नोंद असलेल्या शेतकऱ्यांकडूनच धान खरेदी करण्यात यावे.धानखरेदी केंद्राचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी धान खरेदी केंद्राबाबत  शासन स्तरावर एक मध्यवर्ती माहिती संकलन कार्यालय करता येईल का याबाबत संबधित यंत्रणांनी चाचपणी करावी.धान खरेदी केंद्रावर प्रशिक्षित ग्रेडरची नेमणूक करावी.सर्व गोदांमाचेही योग्य व्यवस्थापन करण्यात यावे तसेच कोणताही शेतकरी धान नोंदणीपासून वंचित राहता कामा नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

          अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणालेमिलर्स सोबत करारनामे करताना त्यांना सर्व अटी व नियम यांची माहिती देण्यात यावी.जे मिलर्स केलेल्या करारनाम्यातील अटींचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मिलर्सकडून प्राप्त होणारा सिएमआरची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रशिक्षित गुणवत्ता यंत्रणेची नेमणूक करण्यात यावी.याबाबत शासन व भारतीय अन्न महामंडळ यांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही करण्यात यावे जेणेकरून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती संबधित कर्मचा-यांना देण्यात यावी, जेणेकरून गोदामाचे व्यवस्थापन या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. बारदानाच्या आवश्यकतेबाबत शासन स्तरावरून माहिती संकलित करण्यात येवून प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून बारदाना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यात येईल अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या.

            श्री.भुजबळ म्हणालेपणन हंगाम २०२०-२१ साठी ज्वारीबाजरीगहूमका व रागी या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व अंदाजीत उत्पादन याबाबत योग्य माहिती घेण्यात यावी. जेणेकरून केंद्र शासनास भरडधान्याच्या बाबतीतील माहिती कळविण्यात येईल. भरडधान्याची प्रत व गुणवत्ता तपासूनच खरेदी करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही अन्न,नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

 सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देणार

- महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात

 

·       गांधी जयंतीपासून मोफत घरपोच सातबारा मोहीम

         

          श्रीरामपूरदि.30 : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिलाआता 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी घेण्यात येत असल्याची घोषणा श्रीरामपूर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

          महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात म्हणालेनागरिकांना सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा खाते उतारा थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदाराच्या हातात देऊन आम्ही हा नव्या स्वरूपातील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत. याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

          राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणीसंगणकीकृत सातबाराऑनलाइन फेरफारजलदगतीने जमिनींची मोजणीसामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा नव्या स्वरुपातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खातेउताराचीही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवालतलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

0000

 दिलखुलासकार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

 

          मुंबईदि. 30 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची  'नियम पाळा,कोरोना टाळाया विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर बुधवार दि. 1 सप्टेंबर आणि  गुरूवार दि.2  व शुक्रवार दि.3 सप्टेंबर 2021  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          राज्यातील लसीकरणाची सद्यस्थितीतिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे असलेले नियोजन,डोअर टू डोअर लसीकरण,लसीकरणानंतरही घ्यावयाची काळजी,डेल्टा आणि डेल्टा प्लस हा व्हेरियंट, या आजाराचे रूग्णकोरोना प्रतिबंधात्मक उपाय याविषयी राज्यातील जनतेला केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. टोपे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

0000


 

Featured post

Lakshvedhi