प्र.के.अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटले...
ही टीका तालिबानी वृत्ती पेक्षाही वाईट होती.
तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही.
त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,
" माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात
असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला,
व त्यात तिचा गर्भपात झाला ...
आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले ..."
यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ,
ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला...!
मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.
त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली,
पश्चाताप केला आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले...!
ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती...!
ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत ..??🤔
आजची संस्कृती म्हणजे ....,
तुला चप्पलने मारतो ...,
कानशिलात मारतो ...,
कोथळा काढतो....,
राडा...,
ही आहे...!
आता हा राडा पुढे न्यायचा ...?
का यशवंतराव - अत्रे यांची नीती पुढे न्यायची...??
हे आपल्या युवकांच्या हातात आहे...!!
No comments:
Post a Comment