Saturday, 28 August 2021

 भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रभूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळखनवा आयाम देईल

                                                     - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            पुणेदि. 27 :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ राज्यातील भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळखनवा आयाम देणारे ठरेलअसा विश्वास व्यक्त करत या केंद्राचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईलअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

            भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

         यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हीसीद्वारे)जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाणमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

         उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेया केंद्राच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील भूजलाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहेही अत्यंत समाधानाची बाब आहे. यामुळे विविध कारणांसाठी वाढलेल्या पाण्याच्या मागणीचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल. भूजल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ ही भूजल व्यवस्थापनाच्या डिजीटल कामाची सुरुवात आहे. या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या माहितीचा सुयोग्य आणि सक्षमतेने वापर करण्याची गरज आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था काम करीत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठा कालावधी लागतो. पुढच्या पिढीचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करणे ही काळाची गरज आहे.

         ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून राज्यासाठी भूजलाच्या बाबतीत एक दर्जेदार यंत्रणा उभी रहात आहे. आपल्या राज्यासाठी भूजल उपलब्धता ही अतिशय महत्वाची बाब आहेअत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. ती आपल्याला जपली पाहिजे. यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहेअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री पाटील म्हणालेभुगर्भातील भूजल तपासणी करण्यासाठी भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याचे सुक्ष्म नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. हर घर जलहर घर नल या योजनेच्या माध्ययातून राज्यात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन काम करीत आहे.

जलसंपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे. जलसंपत्ती वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संपूर्ण प्रकारे प्रयत्न करणार असल्याचेही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री पाटील म्हणाले.

           विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याभूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शेती विकास केंद्रासारखे विविध केंद्र उद्योजक व शासन यांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. त्यामुळे शाश्वत विकासविषयक पायाभूत विकासाचे काम होण्यास मदत होणार आहे. त्यातूनच विकासाचे इंद्रधनुष्य आपल्याला बघायला मिळणार आहे.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांनी केले.  तर उपस्थितांचे आभार सहसंचालक डॉ. साळवे  यांनी मानले.

00000


 

 देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना

·       स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

·       स्टार्टअप्स-शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न उद्योग मंत्री सुभाष देसाई

·       उत्कृष्ट 24 स्टार्टअप्सना प्रत्येकी 15 लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश

 

 

          मुंबईदि. 27 : देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंगप्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणेफिशपॉन्डचे आधुनिकरणएयर फिल्टरमार्फत इंधन बचतपोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट 24 स्टार्टअप्सना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तरस्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतीलअसे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.    

            विजेत्या उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादनेसेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्ताहासाठी देशभरातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होतीत्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन आयोजित सप्ताहात मंत्रीगुंतवणूकदारतज्ञउद्योजकशासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना गौरविण्यात आले. प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषीशिक्षणकौशल्य विकासआरोग्यसुविधाशाश्वतता (स्वच्छ ऊर्जाजलव्यवस्थापनकचरा व्यवस्थापन)प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.

            कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यावेळी म्हणाले कीराज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या सप्ताहास देशभरातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. एकविसावे शतक हे डिजीटल क्रांतीचे शतक आहेयामध्ये जगात भारत देश अग्रस्थानी राहील. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आपले विशेष योगदान देत आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबरोबरच यासंदर्भातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. विविध खरेदीशासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्येही तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारीत स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. राज्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. यापुढील काळातही युवक-युवती आणि महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनामार्फत विविध निर्णय घेण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले.

            उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले कीदेशाच्या ग्रामीण भागासह शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या अनुषंगाने सप्ताहामध्ये सहभागी तरुणांनी विविध संकल्पना मांडल्या. याशिवाय कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या बनलेल्या आरोग्य क्षेत्रासाठीही नवनवीन संकल्पना सादर करण्यात आल्या. मत्सविकाससारख्या क्षेत्रासाठीही तरुण नवनविन संकल्पना शोधत आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून या सर्व नवसंकल्पनांना गुंतवणूकदार तसेच शासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. अशा प्रयत्नातून स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. उद्योग विभागामार्फतही यासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना करण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले.

            कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या सप्ताहामुळे शहरी भागासह ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. कृषीआरोग्यपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापनअपारंपरिक उर्जा अशा विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळाले आहे. शिवाय त्यांना आपले प्रॉडक्ट उद्योजक आणि शासनासमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेलअसे त्यांनी सांगितले.

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या कीमहाराष्ट्र राज्याने इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कौशल्य विकास विद्यापीठआयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांमधून तरुणांमधील व्यावसायिकताउद्योजकतेला चालना देण्यात येत आहेअसे त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका सांगितली. तरुणांच्या बदलत्या आशा-आकांशांना चालना देणे तसेच त्यांच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शासन यंत्रणेत वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. तरुणांचाही शासनासमवेत भागीदारी करण्यामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजकगुंतवणुकदारांनाही नवनवीन संकल्पना मिळत आहेतअसे त्यांनी सांगितले.

            यावेळी शिक्षण क्षेत्रातील इलिमिनो किड्स एलएलपीहेसा टेक्नॉलॉजीजरिझरव्हॉयर न्युरोडायव्हर्सिंटी कन्सलटंट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले. तसेच प्रशासन क्षेत्रातील सीव्हीसडेफिनिटीक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्सप्रानटेक मीडीयाकृषी क्षेत्रातील आर्यधन फायनान्शियल सोल्युशन्सग्रामहीतक्रुशक मित्र ॲग्रो सर्व्हीसेसशापोज सर्व्हीसेसआरोग्य क्षेत्रातील ब्लॅकफ्रॉग टेक्नॉलॉजीजहेल्थ व्हील्सपेरीविंकल टेक्नॉलॉजीजविंडमिल हेल्थ टेक्नॉलॉजीजशाश्वत पायाभूत सुविधा आणि मोबीलिटी क्षेत्रातील ग्राउंड रिॲलिटी एन्टरप्राईजेसक्यूईडी ॲनॅलिटीक्सस्मॉल स्पार्क कन्सेप्ट्सयोटाका सोल्युशन्सशाश्वतता क्षेत्रातील आय कॅपोटेकमॅकलेक टेक्निकल प्रोजेक्ट लॅबोरेटरीपक्षीमित्र पोल्ट्री टेक्नॉलॉजीजसोलीनास इंटिग्रीटी तर इतर क्षेत्रातील जेएचकेपी टेक्नॉलॉजीजनेचर डॉट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले.

            कार्यक्रमात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंहअन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारेफार्मइजीचे सहसंस्थापक डॉ. धवल शाहहंड्रेड एक्स डॉट व्हीसीचे संस्थापक संजय मेहताएसीटी ग्रँटस्चे प्रवक्ते संदीप सिंघलआयएमसीचे माजी अध्यक्ष राज नायर यांच्यासह सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

 कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार


 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर


▪  काळजी नको; आता येणार 'शासन आपल्या दारी'  


▪ अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज   


▪ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार


▪ सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या


▪ कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार  


          मुंबई, दि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.


घरी जाऊन घेण्यात येणार योजनांचे अर्ज


          या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी  क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ  बालकांच्या  कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची  माहिती देतील. तसेच विविध  योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे  सादर करतील.


          या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार हे असून तालुका शिक्षण अधिकारी, तालुका विधी  सेवा प्राधिकरण, नगरपारिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक/ पोलीस निरिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (समाज कल्याण), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यात उपयोजनेचे प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांच्या पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी हे सदस्य तर बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ शहरी) हे सदस्य सचिव असणार आहेत.


          यामध्ये कुटुंब निवृत्तीवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, शुभ मंगल सामुहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.


          याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क  यासंबंधीची कामे तसेच महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधित राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


          राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक कोरोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला.


००००

Friday, 27 August 2021

 मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना

आयकर कपात परिगणनेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 

            मुंबई,दि.26: मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रीय हद्दीतील आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत अधिदान व लेखा कार्यालयास पाठवावीत असे आवाहन सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) यांनी केले आहे.

       आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी नवीन  करपद्धती (New Tax Regime)  व जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime) करआकारणी असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.जे निवृत्तीवेतनधारक यामधील कर निवडीविषयी विहित वेळेत अधिदान व लेखा कार्यालयास कळविणार नाहीत त्यांची जुन्या कर पद्धतीने (Old Tax Regime)  आयकर वसुली केली जाईल. टॅक्सधारकांनी निवडलेला Tax Regime पर्याय व त्यासाठी आवश्यक असणारी आयकर वजातीस पात्र बचत तसेच गुंतवणूक प्रमाणपत्रे व पावत्या अधिदान व लेखा कार्यालयास आपले संपूर्ण नावपीपीओ नंबर बँक व ब्रँच सहीत apaopensdat.mum-mh@gov.in या ई-मेल आयडीवर  30 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.वित्तीय वर्ष 2021-22 करीता ज्या निवृत्तीवेतनधारकांची अंदाजित स्थूल वार्षिक निवृत्तीवेतन रक्कम रु. 6,50,000/- पेक्षा जास्त आहे त्यांची आयकर वसुली त्यांच्या मासिक निवृत्तीवेतनातून समप्रमाणात सुरु करण्यात आलेली आहे.

             तरी निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा),अधिदान व लेखा कार्यालयलेखा कोष भवनए विंगपहिला मजला,कौटुंबिक न्यायालय व एमएमआरडीए कार्यालयाजवळवांद्रे-कुर्ला संकुलवांद्रे (पूर्व)मुंबई 400051. सादर करण्यात यावीत असे एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

००००


 


 एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

 

            मुंबई दि. 26 : एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाईवैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीयापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारीत करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल. कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्सपॅरामेडिकल स्टाफआरोग्य कर्मचारी यांचे महत्व दिसून आले. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळते आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकिती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिका सुध्दा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. इतर राज्यात याबाबत काय परिस्थिती आहे अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या.

            श्री. देशमुख म्हणाले कीवैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्व समजून आले आहे. आज शाळांमध्ये सुध्दा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखानेविमानतळसार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुध्दा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे.आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकेलतसेच नवे अभ्यासक्रम याबाबतही नियोजन करण्यात यावे.

0000

 राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करतांना

स्थानिकांसाठी रोजगार संधी

                                                                                                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       गुंतवणूकदारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

            मुंबई दिनांक 26: राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्येसाधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील,  हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतीलया माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्यशासन गुंतवणूकदाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाहीही यावेळी दिली.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचात्या प्रगतीस पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. लोकसत्ताने इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह 2021 चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाईउद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरेसीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही नरेंद्रनलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरयांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.

            स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  दै. लोकसत्ताने अतिशय गरजेच्यावेळी या परिसंवादाचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोरोनाच्या आजच्या संकटकाळात आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपल्यासमोर यातून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत त्यापैकी एक रोजीरोटीचे आहे. महाराष्ट्राने या आव्हानाचे संधीत रुपांतर करतांना कोरोनाच्या काळातही उद्योग व्यवसायांना दिलासा देण्याचे काम केल्याचे व अनेक नवनवीन उपक्रम सुरु केल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, आज कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला  दिसत असतांना आपण हळुहळु काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हा मधला काळ मागे वळून पाहण्यासाठीचा आहे. आपण काय केले आणि काय केले पाहिजे या धोरणात्मक बाबींच्या निश्चितीसाठी हा वेळ उपयोगी लावला जात असून महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी  आपलेपणाची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे.  या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला आपलं समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करावे अशी अपेक्षाही श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

            राज्यात उद्योगस्नेही वातावरणाची निर्मिती करण्याला शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना देण्यात येत असलेल्या सुविधांची तसेच यासंबंधाने घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. एक खिडकी योजनाउद्योग मित्रांची नियुक्तीकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणेवीजेचे दर कमी करणे यासारख्या विषयांवरही शासन काम करत आहे परंतु असे निर्णय घेतांना राज्याचा समतोल विकास होईल याकडेही लक्ष द्यावे लागतेसर्वसामान्य नागरिकांसह अनेक क्षेत्रांकडेही लक्ष देणे गरजेचे असते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

            मुख्यमंत्र्यांनी पर्यटनक्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचे सांगतांना पर्यटनक्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती दिली. काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोरोना कालावधीत सक्षम नेतृत्व - उद्योगमंत्री सुभाष देसाई

            मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारे नेतृत्व दिले असे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            श्री देसाई म्हणालेजीवन वाचविण्याचे लक्ष आपल्यासमोर आहे. अचानक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतरच राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आले आणि राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यात आले.

राज्यात नवे उद्योग राज्यात

            राज्यातील प्रस्थापित उद्योगांसोबतच नवे उद्योग राज्यात सुरू होत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाने औषधी वनस्पतीवर आधारीत उद्योग कुडाळ येथे सुरू होत आहे. नासिक येथे रिलायन्सची जैविक विज्ञानावर आधारित संशोधनासाठी साडेपाच कोटीची गुंतवणूक झाली आहेयवतमाळ येथे 60 हजार 500 कोटी रूपयांचा विटाल ग्रुपचा वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचबरोबर गेल इंडिया ‘ ने अलिबाग जवळ सिएनजी व इंधन निर्मितीच्या प्रकल्पाची सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

            ऑक्सिजन क्षेत्रात सक्षम होण्यासाठी प्राणवायु निर्मीतीचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आतापर्यंत सुमारे 60 कंपन्यांची भूखंड मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुर्गम भागांत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांवर दिडशे टक्के परतावा देण्यात येणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.

            तळेगाव पार्क जवळ इलेक्ट्रॉनिक्स पार्क तयार होत आहे,राज्यात डेटा सेंटर तयार होत आहेमिहान मध्ये एअरबस प्रकल्प येऊ घातला आहेऔरंगाबादमध्ये बिडकीन येथे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे.त्याचप्रमाणे राष्ट्राच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा मोठा असा सेवा उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी अनेक मोठे उद्योग राज्यात येण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचा उद्योग विभाग सज्ज आहे.

            खादी ग्रामोद्योगमहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून तयार होणारे ग्रामिण कलावंतांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तुंना फ्लिपकार्ट, ॲमेझॉनइकाई सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून दिली आहे.

            राज्यातील 60 टक्के नागरिक हे 35 वर्षाखालील आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी महाजॉब पोर्टल सारख्या माध्यमातून रोजगारासाठी सहकार्य करण्यात येते. राज्य हे खऱ्या अर्थाने मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. असेही उद्योगमंत्री म्हणाले.

रोजगार निर्मितीसह प्राण वाचविणारा विभाग - अदिती तटकरे

            राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवण्याबरोबरच ऑक्सिजन निर्मीती करून लोकांचे प्राण वाचविण्याचे काम उद्योग विभागाने केले आहे.असे उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, राज्यात टाळेबंदी असतांना देखील उद्योगक्षेत्र अहोरत कार्यरत होते. आरोग्यविभागाच्या बरोबरीनेच कोविड रुग्णांसाठी उद्योग विभाग आणि उद्योजकांनी कार्य केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही राज्यावर उद्योजकांनी विश्वास ठेवला आणि ५६ सामंजस्य करारआणि सुमारे १ लाख ३० हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली. राज्यातील औद्योगिक विकासात महिलांचे योगदान वाढावे यासाठी विशेष प्रोत्साहन देणारी योजना राज्यातर्फे राबविली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचाऔद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी लोकसत्ताच्या वतीने इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली जात आहे. या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे.

            देशातील औद्योगिक उत्पादनाच्या 15 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर सात दशके महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. कोरोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.

००००

 राज्यपालांच्या हस्ते 'एक मनोहर कथापुस्तक प्रकाशित

 

          मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित 'एक मनोहर कथाया पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसलेखिका मंगला खाडिलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

००००

 

Governor releases book on Manohar Parrikar

 

          Governor Bhagat Singh Koshyari released the book Ek Manohar Katha on the life of former Defence Minister and former Chief Minister of Goa late Manohar Parrikar at Raj Bhavan Mumbai on Thursday (26th Aug).

            Leader of Opposition Devendra Fadnavis, author of the book Mangala Khadilkar and others were present.

--


Featured post

Lakshvedhi