Friday, 27 August 2021

 एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

 

            मुंबई दि. 26 : एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाईवैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीयापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारीत करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल. कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्सपॅरामेडिकल स्टाफआरोग्य कर्मचारी यांचे महत्व दिसून आले. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळते आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकिती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिका सुध्दा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. इतर राज्यात याबाबत काय परिस्थिती आहे अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या.

            श्री. देशमुख म्हणाले कीवैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्व समजून आले आहे. आज शाळांमध्ये सुध्दा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखानेविमानतळसार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुध्दा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे.आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकेलतसेच नवे अभ्यासक्रम याबाबतही नियोजन करण्यात यावे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi