Tuesday, 24 August 2021

 ठाणे जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी

एकलव्य निवासी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

 

अनुसूचित जमातीआदिम जमातीपारधी जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

          मुंबई दि २४- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आठ निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळांच्या इयत्ता ६वी च्या वर्गासाठीतसेच इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावेत असे अवाहन प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            ठाणे विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा पालघर येथील डहाणूजव्हार तसेच शहापुर अंतर्गत एकुण आठ एकलव्य निवासी शाळा कार्यान्वित आहेत. या शाळेमध्ये इयत्ता ६ वीच्या वर्गात नियमित प्रवेश २४० मुले व २४० मुली तसेच इयत्ता ७ वीच्या वर्गात मुले ५७ व मुली ५२इयत्ता ८ वीच्या वर्गात मुले ३३ व मुली ३८ आणि  ९ वी च्या वर्गातील मुले ४ अशा  रिक्त जागा भरणेकरीता अनुसूचित जमाती / आदिम जमाती / पारधी जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

             शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येतेतसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवासअंथरुण-पांघरुणभोजनगणवेषपाठयपुस्तकेवहया व शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमव्यवसाय प्रशिक्षण आणि इतर विशेष पाठ्योत्तर कार्यक्रम यासाठी विशेष लक्ष पुरविण्यात येते.

            रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याकरीता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टल वरील Student ID माहित असणे आवश्यक असल्याचेही प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी सांगितले आहे.

0000


 

आदिवासी विकास विभागाकडून शिधापत्रिका,

जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन

           

            नाशिक दि. 23 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांच्या पुर्ततेत शिधापत्रिका व जातीचा दाखला महत्त्वपूर्ण आहे. या कागदपत्रांच्या अभावामुळे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात 1 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्याकरीता आदिवासी विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहेअशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसारआदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या बांधवांसाठी शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष मोहिम सर्व अपर आयुक्त यांच्या अखत्यारीत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व प्रांत अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी. या शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे शुल्क हे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लियस बजेट) या योजनेतून अदा करण्यात येणार असल्याने स्थानिक स्तरावर हे दाखले विनामुल्य उपलब्ध होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

            शिधापत्रिकाजात प्रमाणपत्र देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणारी विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांना देखील आवाहन करण्यात येत आहेअसे आदिवासी विकास आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


 

विविध योजनातील अनुदान

शेतकऱ्यांना तातडीने द्यावे

-  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

            मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

            फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवलेकृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी व फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणालेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेपीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामांचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

            स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो कायाबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबागठिबक सिंचनशेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

 शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्यावे

-  फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

            मुंबई दि 24 :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या.

            फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवलेसंचालक डॉ.के. मोने तसेच संबंधित कृषी अधिकारी उपस्थित होते.

            फलोत्पादन मंत्री श्री भुमरे म्हणालेशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेपीक रचनेत बदल घडवून आणणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे या उद्देशांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ अदा करण्यात यावेत. याचबरोबर फलोत्पादनाच्या विविध कामाचा आढावा यावेळी मंत्री श्री. भुमरे यांनी घेतला.

            स्ट्रॉबेरी फळाच्या उत्पादनाचा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये योजनेअंतर्गत समावेश करता येतो कायाबाबत अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना कलम -रोपांची उपलब्धता करून देण्यासाठी असलेल्या संपूर्ण 143 शासकीय रोपवाटीका पुर्ण क्षमतेने सुरू राहण्यासंदर्भात कारवाई करावी. रोपवाटिकांवर नवीन व सुधारित वाणांच्या विविध फळाझाडांच्या मातृवृक्षांची लागवड करावी. रायगड जिल्ह्यातील सुपारीस विशेष बाब म्हणून व मातृवृक्ष म्हणून मान्यता देण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी. फळबागठिबक सिंचनशेततळे, राष्ट्रकृषी विकास योजना अशा विविध बाबींच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

0000


 *सुप्रीम कोर्ट के आदेश और भारत सरकार के निर्देशानुसार कोई भी अधिकारी या डॉक्टर आपको कोरोना वैक्सीन या कोई अन्य वैक्सीन लेने के लिए मजबूर नहीं कर सकता है* - June 26, 2021


∆ *यदि आप टीका नहीं लगवाना चाहते हैं। तो आपको यह निर्णय लेने का पूर्ण अधिकार है*


∆ *उच्च न्यायालय ने फैसला सुनाया है कि, जिन नागरिकों को पूरी जानकारी के बिना टीकाकरण के लिए मजबूर किया गया है। टीका लगाया गया है। धोखा दिया गया है, या टीकाकरण के लिए मजबूर किया गया है। उन्हें मुआवजे की मांग करने का अधिकार है।*


∆ *मानवाधिकार सुरक्षा परिषद और इंडियन बार असोसिएशन ने पीड़ितों को एक करोड़ रुपये अग्रिम मुआवजे (Interim Compensation) देने  की मांग की है।*


*नई दिल्ली :- नागरिकों को गुमराह करके उन्हें टीकाकरण के लिए बाध्य करने वाले अधिकारियों के खिलाफ कानूनी कार्रवाई तथा नागरिकों के मानवाधिकारों और मूलभूत संवैधानिक अधिकारों का उल्लंघन करने के लिए प्रत्येक  पीड़ित नागरिकों को कम से कम अग्रिम मुआवजा 1 करोड़ रुपये सरकार उन्हें देना और वह राशि आरोपियों से वसूल करने की मांग मानवाधिकार सुरक्षा परिषद के राष्ट्रिय महासचिव रशीद खान पठान तथा इंडियन बार असोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश ओझा ने की है।*


अ‍ॅड. निलेश ओझा 

                                   राष्ट्रीय अध्यक्ष

                            इंडियन बार  एसोसिएशन


https://supremecourtnewss.blogspot.com/2021/06/blog-post_26.html


*भारत सरकार के निर्देश और मा. सर्वोच्च न्यायालय तथा मा. उच्च न्यायालय ने भी फैसला सुनाया है । कि, वैक्सीन किसी के लिए बाध्यकारी नहीं है। मा. सर्वोच्च न्यायालय और मा. उच्च न्यायालय का भी दिया हुआ फैसला इंडियन बार असोसिएशन की वेबसाइट पर उपलब्ध हैं।*


Blog Link:- https://indianbaras sociation.in/vaccination-is-not-mandatory-as-per-the-latest-judgment-of-high-court/


*इसी आदेश के अनुसार, प्रत्येक व्यक्ति आयुर्वेदिक, प्राकृतिक चिकित्सा, होम्योपैथी, यूनानी या किसी अन्य उपयुक्त उपचार पद्धति से अपना इलाज कर सकता है।*


*कोरोना वैक्सीन लेने से कई जानलेवा दुष्परिणाम सामने आए है, वैक्सीन की दोनों खुराक लेने के बावजूद भी कई लोंगो की कोरोना से मृत्यू हुई है और इसका सबसे बड़ा उदाहरण यह है कि, इंडियन मेडिकल असोसिएशन के मा. अध्यक्ष के. के. अग्रवाल वैक्सीन की दोनों खुराक लेने के बाद भी उनकी कोरोना से मौत हो गई।*


*इंडियन बार असोसिएशन ने उन्हें ५१ पन्नों की कानूनी नोटिस ( Legal Notice ) देते हुए डॉ. सौम्य स्वामीनाथन को, हुए प्रत्येक नागरिकों की हत्या के लिए जिम्मेदार ठहराते हुए उनके विरुद्ध भारतीय दंड सहिंता  ( I. P. C) के तहत ३०२ , ३०४, १८८, १२० (ब) r/w ३४ के अनुसार करवाई करने का इशारा दिया।*


*नोटिस मिलते ही विश्व स्वास्थ्य संगठन [ डब्ल्यू. एच.ओ / WHO ] की मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्य स्वामीनाथन ने घबराकर आइवरमेक्टिन के विरुद्ध में किये हुए 'ट्वीट' को डिलीट (Delete) कर दिया।*


*इंडियन बार असोसिएशन के प्रयास से  डब्ल्यू. एच.ओ [ WHO ] के अधिकारियों के झूठ और जनता को मुर्ख बनाकर उनके जीवन से खिलवाड़ करने तथा जीवन निर्वाह का हनन करके उनको गरीब बनाने का प्रयत्न सामने आ गया |*


*सभी नागरिकों से निवेदन है कि वे अपने डॉक्टरों के सलाह से आइवरमेक्टिन या आयुर्वेदिक या नॅचरोपॅथी के सहायता से उपचार करके अपने परिवार का जीवन और पैसा बचाकर तथा पुरे देश में फीर लॉकडाऊन ना लगने में सहायता करे।*


*इसी प्रकार , इस मुद्दे पर अनेक लोगों में जानकारी पहुचाये और जन - जागृती फैलाने का प्रयास करते हुए इस राष्ट्रीय आंदोलन में अपना सहयोग करें।*


नोट:i) वैक्सीन कंपनियों के निर्देशानुसार एलोपैथी दवाईओं के उपभोक्ता तैयार करने के लिए वैक्सीन (VACCINE) लगवाई जा रही है


अर्थात भूल कर भी वैक्सीन (VACCINE) ना लें बचे भारतीय

 ✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती 

हारल्यानंतरही Smile😊 देते ना,

✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 

जिंकण्याचा आनंद गमावून बसते....


    💞शुभ सकाळ💞

 *माहितीसाठी सांगतोय,*

*पुण्यात पण तालिबानी राहायचे बरं का..!*

*तात्यासाहेब फुलेंच्या शिक्षणाला विरोध करायचे...*

*आई सावित्रीबाईंना शेण, चिखल आणि दगडगोटे मारायचे..*

 How do you know you are rich ?


Amazing answer by Mr Awadhesh Singh, an ex student of IT-BHU (now IIT-BHU)


When I was doing my B Tech, there was a Professor Das Talukedar who used to teach us ‘Mechanics’


His lectures used to be very interesting since he had an interesting way to teach and explain the concepts.


One day, in the class, he asked the following questions,


1. What is ZERO?

2. What is INFINITY?

3. Can ZERO and INFINITY be same?


We all thought that we knew the answers and we replied as following,


ZERO means nothing

INFINITY means a number greater than any countable number


ZERO and INFINITY are opposite and they can never be same


He countered us by first talking about infinity and asked, ‘How can there be any number which is greater than any countable number?’


We had no answers


He then explained the concept of infinity in a very interesting way, which I remember even after more than 35 years


He said that imagine that there is an illiterate shepherd who can count only upto 20.


Now, if the number of sheep he has less than 20 and you ask him how many sheep he has, he can tell you the precise number (like 3, 5 14 etc.). 

However, if the number is more than 20, he is likely to say “TOO MANY”.


He then explained that in science infinity means ‘too many’ (and not uncountable)* *and in the same way zero means ‘too few’ (and not nothing)


As an example, he said that if we take the diameter of the Earth as compared to distance between Earth and Sun, the diameter of earth can be said to zero since it is too small.


However, when we compare the same diameter of earth with the size of a grain, diameter of earth can be said to be infinite.


Hence, he concluded that the same thing can be ZERO and INFINITE at the same time, depending on the context, or your matrix of comparison.


The relationship between richness and poverty is similar to the relationship between infinity and zero.


*It all depends on the scale of comparison with your wants*.


If your income is more than your wants, you are rich.

If your wants are more than your income, you are poor.


I consider myself rich because my wants are far less than my income.


I have become rich not so much by acquiring lots of money, but by progressively reducing my wants.


If you can reduce your wants, you too can become rich at this very moment.


HAVE A GREAT DAY

Monday, 23 August 2021

 राज्यात कलाकेंद्रआठवडे बाजार आणि यात्रा

लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 23 : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. राज्यात कलाकेंद्रआठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यां अमित देशमुख यांनी सांगितले.

            अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्यासह शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना महासंघाचे निवेदन दिले.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीराज्यातील तमाशालावणी आणि लोक कलावंतांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे. निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया करण्यात येत आहे.

            लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेअधिवेशनाच्या काळात पारंपारिक लावणी कलावंतांचा राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित करणेवृध्द कलावंत यांना मानधनामध्ये वाढ मिळावीराज्यातील पारंपारिक लावणी आणि तमाशा कलावंतांच्या घरसंकुलासाठी पुणे येथे 5 एकर जागा मिळावीसांस्कृतिक कार्य विभागामार्फत असणाऱ्या समितीवर लावणीतमाशा आणि लोककलावंतांना प्रतिनिधीत्व मिळावे अशा काही मागण्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्यासमोर मांडल्या.

0000

Featured post

Lakshvedhi