Monday, 23 August 2021

 *माणूस*

आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय हे कळलं पाहिजे! एकाच घरातील सहा-सहा लोक कोरोनाने गेले... माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचं होतं का?

       एकेकाळी चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठे सापडत नाही आणि सापडलीच तर त्यावर फुल व्हायला माणूस सापडत नाही! कालचक्र खूप मोठं आहे, एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढे एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे. कोरोनाने दाखवून दिलं की, कोणीही सहज मरू शकतो! श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण, पुरूष, स्त्री, वयस्क, मूल, आई, वडील, भाऊ बहीण... जिवंत असलेला प्रत्येकजण अवेळी मरू शकतो हा संदेश या आजाराने दिला!

      या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे, या लाटेची दाहकता आपण पाहिली आहे.‌ प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली. पुढील तिसरी, चौथी आणि अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच, तरीही आपण 'मीच मोठा' या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय. शंभर एकर जमीनीचा मालक दहा वीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जळून गेला, शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी गेली एकाकी गेली. ज्याच्या हाकेवर गाव‌ गोळा व्हायचा तो अॅम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्र्वास मिळावा म्हणून तडफडून मेला. असं बोललं जायचं की, याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पुर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच गेला!

     जर हे लोक एखाद्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने गेले असते तर विषय वेगळा असता, मनाने स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला, चालता-बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही. बरं जी व्यक्ती गेली ती सहजासहजी नाही तर, ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या अॉक्सिजन अभावी गेली हे किती दु:खद आहे!

     मी बघितलंय या सर्वांना शेवटचा श्वास घेताना, शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल? आपली संपत्ती? नातेसंबंध? घर? जमीन? शरीर, कमाई, भविष्य, स्वप्नं... नाव, जात, धर्म? काय आठवलं असेल सर्वात शेवटी? 'फक्त एक... एकच संधी मिळावी, मी माणूस म्हणून जगेल!' असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना? 

     हे सर्व लिहीताना *मी आणि हे वाचताना तुम्ही जिवंत* आहात, आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण *माणूस म्हणून जगत आहोत का?* निसर्ग अधूनमधून माणसाला माणूसपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आतातरी *माणुसपण शिकायला* काय हरकत आहे की अजून एखाद्या संकटाची वाट बघायचीय?

 जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन

·        मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला गोविंदा पथकांचा सकारात्मक प्रतिसाद

 

            मुंबई दि. 23 : काही काळासाठी आपले सणवारउत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊयासंयम  आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार  करूयाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला आहेहे देखील श्री.ठाकरे यांनी स्पष्ट केले.

            आज राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.  उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू  अशी भावना व्यक्त केली.

            बैठकीस  उपमुख्यमंत्री अजित पवारगृहमंत्री दिलीप वळसे पाटील,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरातपरिवहन मंत्री अनिल परबआमदार सुनील प्रभू,  आ. प्रताप सरनाईक,  माजी मंत्री सचिन अहीरमाजी आमदार बाळा नांदगांवकरमुख्य सचिव सीताराम कुंटे,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,   आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यासमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहलमुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे,  टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ. शशांक जोशी,  डॉ. राहूल पंडितबाल टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभुडॉ. अजित देसाईविविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त,  पोलीस अधिकारी,  दहिहंडी समन्वय समितीचे  पदाधिकारीगोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

पहिल्यांदा आरोग्याचा विचार

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीसणवारउत्सवाबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत पण आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो.  मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोतत्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेतपण ही बंधने कुणासाठी याचा देखील विचार करण्याची गरज आहे. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.

जगभराचा अनुभव कटू

            सगळे जग या विषाणूने त्रासलेले आहे. गेल्या दोन लाटेत जी बालके अनाथ झालीज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्याकुटुंबच्या कुटुंब अनाथ झाली,  त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटेतला आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाही तर जगाचा अनुभवही कटु आहे. दोन डोस दिलेल्या देशातही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशात पुन्हा निर्बंध लावले जात आहेत.

अजूनही काळजी घेण्याची गरज

            नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे.  हा विषाणू घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. आपल्याकडेही काही जिल्ह्यात दुसरी लाट जोरात आहे. काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा विंडो पिरियड आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपले अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.

तर नाईलाजाने...

            आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून  आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआपण आपली आरोग्य व्यवस्था सक्षम करत आहोतआपण एकाच दिवशी ११ लाख लोकांचे लसीकरण करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.  आपण ऑक्स‍िजनआय.सी.यु बेडची संख्या वाढवत आहोत. पण आपली ऑक्स‍िजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत.  इतर रुग्णांना लागणारी ऑक्स‍िजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्स‍िजनची मागणी  ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सहकार्य कायम ठेवा- अजित पवार

            महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाहीत्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहेडेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे, हे सगळे सांगितले जात असतांना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणानेघरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे असे आवाहन केले. संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल हेही श्री.पवार यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबर अर्थचक्र सुरळित ठेवण्याला प्राधान्य

            अर्थचक्र सुरु राहण्यासाठी काही निर्बंधांमध्ये सुट देण्यात आली असून शासनाचे पहिले प्राधान्य हे आजही लोकांची सुरक्षितता आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याला असल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी पुढच्या काळातही सावधगिरीने पुढे जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

अधिकारी आणि मान्यवरांची मते

            या उत्सवात  मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग सहभागी होतो जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नसल्याचे आयुक्त चहल यांनी यावेळी सांगितले. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटने तसेच नीती आयोगाने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याची माहिती दिली. बहृन्मुंबई पोलीस आयुक्त श्री. नगराळे यांनी आयुक्तांच्या सूचनेला दुजोरा दिला. कोरोनाकाळात  गणेशोत्सवासह सर्व सण  साधेपणाने साजरे करण्याची गरज  त्यांनी व्यक्त केली.

              डॉ. संजय ओक यांनी दहिहंडीचा उत्सव हा अतिशय जवळूनएकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहेया खेळात मानवी थर रचले जात असतांना एकमेकांना  जवळून स्पर्श होतोथर लावतांना अंगावर पाणी टाकले जातेपावसाळा सुरु आहेपाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगतांना ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. दहिहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हा सण आपण  रक्तदानऔषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करूआपल्या उत्सवाचे स्पीरीट वेगळ्या पद्धतीने जपू  असे आवाहन केले.

            डॉ. पंडित यांनी हा सण आपला आवडता असला तरी कोरोनामुळे तो आपल्या साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले विविध देशात ज्यांच्या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत तेथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घेतलेल्या भयानक स्थितीची त्यांनी माहिती दिली.

            हा उत्सव गर्दीत आणि अतिशय जवळून मानवी संपर्कातून साजरा होतो जो कोरोना संसर्ग वाढवण्याला कारणीभूत ठरू शकतो असे सांगून डॉ. जोशी म्हणाले कीआता कुठे आपण दुसरी लाट काही ठिकाणी नियंत्रणात आणू शकलो आहोतअर्थचक्र सुरु करण्यासाठी काही निर्बंध शिथील करू शकलो आहोतत्यामुळे आपल्याला संसर्ग वाढवून चालणार नाही. डॉ. सुहास प्रभुडॉ. अजित देसाई यांनी देखील यावेळी आपली भूमिका विशद केली.

...

 


 

कोरोनाविषयक ब्रेल पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

·        दृष्टिहीन लोकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती आता हिंदी भाषेतून

           

            मुंबई, दि. 23 : दृष्टिहीन व्यक्तींमध्ये कोरोना विषयावर जनजागृती करणाऱ्या ब्रेल लिपितील कोविड – १९ बिमारी और इलाज’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.23) राजभवन येथे करण्यात आले.

            पुस्तकाचे लेखकसर्पमित्र व स्काऊट गाईड जिल्हा आयुक्त भरत जोशी यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. यावेळी दृष्टिहीन व्यक्तींनी ब्रेल लिपितील पुस्तकांचे उतारे वाचून दाखविले.

००००

 

Governor releases Braille book on Covid-19 awareness

 

            Governor Bhagat Singh Koshyari released a Braille book on the subject Covid-19 and its remedy at Raj Bhavan Mumbai on Monday (23 Aug).

            The book in Hindi has been authored by Sarp Mitra and District Commissioner of  Scout and Guide Bharat Joshi with a view to creating awareness about COVID 19 among visually impaired persons.

            Three visually impaired girl students demonstrated their Braille book reading skills on the occasion.

००००

 

 


 ***** थळचा किल्ला खुबलढा! *****


अलिबागच्या उत्तरेला साधारण ५ किलोमीटर अंतरावर थळ नावाचे लहानसे गाव आहे. थळ खांदेरी-उंदेरी किल्ल्यांसाठी आणि उत्तम प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. RCF च्या खत प्रकल्पामुळे या लहानशा गावाला अलीकडच्या काळात खूप महत्व प्राप्त झाले. नारळी पोफळीच्या वाड्या, पर्यटकांना खेचणारे निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जुन्या मंदिरांसाठी थळ ओळखले जात असले तरी येथे एक ऐतिहासिक आणि महत्वाचा भुईकोट होऊन गेला हे फार कमी माहीतीत आहे. हा किल्ला होता थळचा खुबलढा! 


थळच्या बंदराकडे जाताना जेथे मच्छिमार बांधव मच्छी वाळवताना दिसतात त्याच जागेवर पूर्वी हा चार बुरुजांचा लहानसा किल्ला होता. आज येथे किल्ल्याचे कोणतेही बांधकाम दिसत नाही फक्त एका बुरुजाचा पाया आणि इतर काही लहान अवशेष पहायला मिळतात. सध्या हा भाग सपाट करून येथे मच्छिमार बांधव मच्छी वाळवताना, बोटींची डागडुजी करताना आणि जाळ्यांची कामे करताना दिसतात. 


सन १६८० मध्ये खांदेरीच्या बेटावर मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली दुर्ग उभारणी सुरू होती. त्यावेळी खांदेरी बांधू न देण्यासाठी इंग्रज आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांनी जंजिरेकर सिद्दी यास उंदेरी बेटावर दुर्ग उभारणीस परवानगी दिली आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. थळच्या समुद्रकिनारी स्वराज्याचा खुबलढा आणि पाण्यात स्वराज्यातीलच नवीन खांदेरी किल्ला नावारूपाला येत असताना उंदेरीवर सिद्दीने इंग्रजांच्या मदतीने आपले तळ ठोकणे म्हणजे येथील मराठी सत्तेला आव्हान दिल्यासारखे होते. अशा वेळी इंग्रज आणि सिद्दी यांच्या संयुक्त शक्तीला तोंड देणे, खांदेरीला रसद पुरविणे आणि थळच्या किनारपट्टीचे रक्षण करणे अशा तीनही आघाड्यांवर हा खुबलढा ( खडतर लढलेला ) भक्कम उभा होता! 


या किल्ल्याची तटबंदी ३.५ मीटर रुंद असून अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणेच मोठमोठे दगड एकमेकांवर रचून कोणतेही सिमेंटसारखे जोडपदार्थ न वापरता याची उभारणी करण्यात आलेली. कुलाबा आणि या किल्ल्यातील साधर्म्यामुळे यांचा बांधकामाचा काळ एकच असायला हवा पण समकालीन पुराव्याअभावी हा काळ नक्की सांगता येत नाही. 


या किल्ल्याचा सर्वात पहिला उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. २६ जानेवारी १६८० मध्ये महाराजांचा आरमारी अधिकारी दौलतखान याने खूबलढ्यावरूनच सिद्दीच्या उंदेरीवर तोफगोळ्यांचा वर्षाव केलेला. यानंतर शाहू महाराजांच्या काळात ८ जुलै १७३३ रोजी सेखोजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकल्याची नोंद आहे. १० जुलै १७३३ रोजी सेखोजी आंग्रे यांनी लिहिलेल्या एका पत्रातही तशी नोंद आहे. सेखोजी यांच्या निधनानंतर आंग्रे बंधूंमध्ये चालू असलेल्या सत्ता संघर्षात संभाजी व तुळाजी यांनी १७४० मध्ये मानाजींचे जे किल्ले घेतले होते त्यात खुबलढाही होता. पुढे जून १७४७ मध्ये सिद्दीने हा किल्ला ताब्यात घेतला. अडीच महिन्यांनंतर मानाजी आंग्रे यांनी या किल्ल्याला वेढा देऊन मोर्चेबांधणी केली त्यावेळी सिद्दीने उंदेरीवरून हल्ला चढविला होता. यावेळी मानाजी आंग्रे यांनी वेताळाचे स्मरण करून सिद्दीला नमवले होते. आंग्रेकालीन मंदिरांमध्ये वेतळाच्या मुर्त्या अजूनही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. या युद्धात मानाजी आंग्रे यांच्या मांडीला गोळी लागली होती व सिद्दीची २०० माणसे मारली गेली होती. या चकमकीच्या एक दोन वर्षातच किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला होता. १७५० मध्ये सिद्दीने पुन्हा एकदा हा किल्ला जिंकून घेण्यास शेवटचा अयशस्वी प्रयत्न केला. पुढे हा किल्ला मराठ्यांकडेच राहिला. 


या सिद्दीसोबतच्या लढाईचे वर्णन रामजी महादेव बिवलकर व राणोजी बलकवडे यांच्या पत्रात मिळते. या युद्धानंतर हा थळचा कोट राखण्यासाठी मनुष्यबळ, दारुगोळा, अन्नधान्य, डागडुजी अशा गोष्टींवर खूप खर्च होत होता व त्यामानाने कर स्वरूपातून मिळणारे उत्पन्न फार कमी होते. शिवाय किल्ला सिद्दीच्या हातात गेल्यास अजूनही नुकसान झाले असते म्हणून हा किल्ला पाडण्याचे ठरवले गेले. पुढे मानाजी आंग्रे यांनी हा किल्ला पाडून येथील तोफा अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावर नेल्या. पुढे १७९९ मध्ये जयसिंगराव आंग्रे यांनी खांदेरीवरून थळ वर हल्ला केल्याची नोंद मिळते. हा हल्ला बाबुराव आंग्रे यांनी परतवून लावला होता. 


आज येथे एका बुरुजाच्या पायाचा भाग थोडाफार पाहता येतो तो सोडला तर किल्ला म्हणून पाहण्यासारखे येथे काही नाही. येथील बंदरावरून उंदेरी आणि खांदेरी फार जवळ पाहता येतात. उंदेरी येथून १ मैल तर खांदेरी सव्वा मैल पश्चिमेकडे आहेत. खांदेरीच्या दक्षिणेकडील टोकावर असलेला दीपस्तंभ येथून पाहता येतो. हे तिन्ही किल्ले एकाच नजरेत पाहिल्यावर येथे घडलेला इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. हे तिन्ही किल्ले इतके जवळ असल्याने या किल्ल्यांवर तोफांचे किती महत्व असावे हे लगेच स्पष्ट होऊन जाते. हे किल्ले आणि त्यांचा इतिहास म्हणजे थळला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे! 


संदर्भ:

१. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट -१८८३

२. अलिबाग थळ खांदेरी उंदेरी - महेश तेंडुलकर - २०१०

३. रायगड गॅझेटियर - १९९३ 


©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे (www.TheTown.in) 


----------------------------------------------------------------- 


ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा आणि अजूनही अशी माहिती मिळवण्यासाठी या पेजला लाईक करा! 


----------------------------------------------------------------

Sunday, 22 August 2021

 Covid 3rd wave getting postponed due to Afghan crisis....all media houses are  focusing on Afghan and have forgotten covid-3rd wave. .😀😀😀


COVID-19 variants are very angry now, as their launch dates have been postponed / rescheduled 😱😱😱

 जेव्हापासून

*गुगल पे, फोन पे आलय*



तेव्हापासून

*रस्त्यावर पैसे सापडणंच बंद झालंय राव..*

😝😀😝😀😜😆

😜😆😆😃😆🥴

😆🥴😆🥴😆😆

Saturday, 21 August 2021

 डेल्फिक कौन्सिलच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण संपन्न

डेल्फिक कौन्सिलने महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करावा: राज्यपाल

 

          मुंबई,दि.२१: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) शनिवारी (दि. २१) राजभवन येथे अनावरण केले. कौन्सिलच्या माध्यमातून राज्यात कलाकार, सांस्कृतिक संघटना व समूहांना दृकश्राव्य कला व साहित्य कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. 

       महाराष्ट्र ही कला, नृत्य, वादनकला व संस्कृतीची खाण असून डेल्फिक कौन्सिलच्या राज्य शाखेच्या माध्यमातून राज्याच्या कला, आदिवासी कला, संस्कृती व सिनेमाला चालना मिळेल. कौन्सिलने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.

            कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, नेशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल व डेल्फिक कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी साहिल सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य डेल्फिक कौन्सिलचे सदस्य अभी मित्तल, सुरेश थोमससिने निर्माते अली अकबर सुलतान अहमद व चित्रपट क्षेत्रातील अनेक लोक यावेळी उपस्थित होते.

       आंतरराष्ट्रीय डेल्फिक कौन्सिल ही एक जागतिक स्वयंसेवी संघटना असून कला व संस्कृतीच्या माध्यमातून जगभरात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी काम करीत आहे.

            डेल्फिक कौन्सिलच्या वतीने विविध कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या डेल्फिक गेम्सचे आयोजन करण्यात येते. डेल्फिक गेम्सची सुरुवात ग्रीस देशातील डेल्फिक येथे ऑलिम्पिकचे जुळे भावंड म्हणून २५०० वर्षांपूर्वी झाली.

            ऑलिम्पिकमध्ये जसा क्रीडा प्रकारांचा समावेश होतो तसा डेल्फिक गेम्समध्ये कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो. भारतात २२ राज्यात डेल्फिक कौन्सिल्सची स्थापना करण्यात आली असल्याचे साहिल सेठ यांनी सांगितले.

 

Maha Governor, Hema Malini launch Delphic Council Logo

 

     The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the logo of the Delphic Council of Maharashtra of Maharashtra at Raj Bhavan, Mumbai on Saturday (21st Aug).

      Member of Parliament Hema Malini, Chairperson of National School of Drama Paresh Rawal and President of the Delphic Council Maharashtra IRS officer Sahil Seth were present.

      Speaking on the occasion Governor Koshyari said Maharashtra is a repository of music, theatre, performing arts and tribal art. He expressed the hope that the Delphic Council of Maharashtra will promote arts, cinema and culture of Maharashtra.

      State Council Members Abhi Mittal, Suresh Tomas and film producer Ali Akbar Sultan and members of the film industry were also present.

      The Delphic Council Maharashtra is the State chapter of the International Delphic Council, which is a worldwide organisation promoting harmony among people through arts and culture. The Council organizes Delphic Games covering various areas of arts and culture.

      According to Sahil Seth, the Delphic Games were launched in Delphi in Greece 2500 years ago as the twin sister of the Olympic Games. He said the Delphic Games are to art and culture what Olympic Games are to physical sports.

0000

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

            मुंबई,दि. २१ आज वीस रुग्णवाहिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. एमएमआरडीए प्रशासकीय इमारतीशेजारी हा लोकार्पण कार्यक्रम झाला. १४ रुग्णवाहिका स्वदेश फाउंडेशनचे संचालक रोनी स्क्रुवाला३ रुग्णवाहिका पुणे शहर शिवसेना यांच्यातर्फे तर २ रुग्णवाहिका आमदार रवींद्र वायकरआणि १ रुग्णवाहिका माजी नगरसेवक शैलेश फणसे यांच्याकडून देण्यात आली आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेपरिवहन मंत्री अनिल परबआमदार रवींद्र वायकरमहापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.

00000

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु

कोविडचा धोका टाळण्यासाठी जबाबदार नागरिक बना

------------------------

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व थरांतील नागरिकांना आवाहन

            मुंबई, दि. २१ : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारण्यात आलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते.

            केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

            मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेतपण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवसाय सुरु राहावेतअर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.

            आज लोकार्पण होत असलेल्या कोविड काळजी केंद्राविषयी समाधान व्यक्त करून ते म्हणाले कीतिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याने राज्य शासनाने लहान मुलांसाठी कोविड टास्क फोर्स स्थापन केला असून असा टास्क फोर्स स्थापन करणारे आपले पहिले राज्य आहे. मुंबईत आधुनिक अशी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असेही ते म्हणाले.

            आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून हे केंद्र उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

असे आहे लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र

            कलिना विद्यापीठ आय.टी. पार्क येथे उभारण्यात आलेले लहान मुलांचे कोरोना काळजी केंद्र हे पाच हजार चौरस फूटांचे असून रुग्ण खाटांची संख्या ३०  आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्रशस्त जागा आहे. हे केंद्र कोरोनाग्रस्त लहान मुलांना अलगीकरण व त्यांच्या उपचाराकरिता तयार करण्यात आले आहे. याठिकाणी स्तनदा मातांना स्तनपानाकरिता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मुलांसोबत पालकांनाही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये ऑक्सिजनयुक्त अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या कोरोना काळजी केंद्रात २४ तास स्वच्छता व सुरक्षितेसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील व खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजन उपक्रम उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

            या केंद्रात लहान मुलाना दवाखान्यात आल्यासारखे वाटू नये व आनंददायी वातावरण असावे असा प्रयत्न  करण्यात आला आहे. रंगीबिरंगी भिंतीवेगवेगळी खेळणीकार्डबोर्डचे बेड्सआदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

            आजच्या कार्यक्रमासपरिवहन मंत्री अनिल परबआमदार संजय पोतनीसमहापौर श्रीमती किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती. 

            000000

Featured post

Lakshvedhi