वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• वेव्हज 2027 परिषदेच्या तयारीला वेग
मुंबई, दि. 17 : जागतिक दर्जाच्या वेव्हज् परिषदेच्या तयारीला आतापासूनच वेग देत कार्यक्रमाचे नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या, अर्थसंकल्प, प्रसिद्धी, वाहतूक, तांत्रिक व्यवस्था आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात. वेव्ह्ज-2027 अधिक व्यापक, सुटसुटीत आणि प्रभावी आयोजन करण्यावर भर द्यावा, तसेच परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पहिल्या वेव्हज् परिषदेने जागतिक स्तरावर प्रभावी छाप निर्माण केली असून महाराष्ट्राच्या ब्रँड मूल्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे पुढील आवृत्ती अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी आवश्यक आहे. हवामानाचा विचार करून परिषद फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सुचविले.
No comments:
Post a Comment