Friday, 29 May 2026

जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात

 जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात

 

भारताची जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या लोकसंख्यात्मक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे व्यापक चित्र सादर करणारी प्रक्रिया आहे. देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम म्हणून ओळख असलेल्या जनगणना गाव आणि शहर पातळीवरील सर्वात विश्वासार्ह माहितीचा स्रोत मानली जाते. पुराव्यावर आधारित शासनव्यवस्था, विकास नियोजन, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक संशोधन, व्यावसायिक धोरणे, तसेच मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकप्रतिनिधित्व यांसारख्या लोकशाही प्रक्रियांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. जनगणनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या माहितीमुळे शासन आणि विविध संस्था लोकसंख्येतील बदल समजून घेऊन नागरिकांच्या गरजांनुसार धोरणे आखू शकतात.

भारताने १८७२ पासून अखंड जनगणनेची परंपरा जपली आहे, त्यामुळे जगातील काही मोजक्या देशांमध्ये भारताला विशेष ऐतिहासिक स्थान प्राप्त झाले आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता जनगणना २०२७ ही देशाची एकूण सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे. भारतात जनगणना डी फॅक्टो कॅनव्हासर पद्धतीने केली जाते. या पद्धतीत नियुक्त प्रगणक ठराविक कालावधीत प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांकडून थेट माहिती संकलित करतात

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi