एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र तीन टप्प्यात पूर्ण होणार असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरातील 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर बायोगॅस, कंपोस्ट खत तसेच सुक्या कचऱ्यापासून पावर प्लेट्स इंधन तयार होणार आहे.
भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून गॅस विक्रीतून महानगरपालिकेला दरवर्षी 15 लाख रुपयांची रॉयल्टी सुद्धा मिळणार आहे. पर्यावरण पूरक या प्रकल्पासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment