उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल
-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ८ : बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेले गौण खनिज त्याच जागी वापरले तर त्याला रॉयल्टी माफ करण्यात आली असून, बिगरशेतीसाठी आता जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक झाली.
No comments:
Post a Comment