Sunday, 15 March 2026

जागतिक ग्राहक दिनानिमित्त विशेष लेख : जागतिक ग्राहक हक्क दिन : "Safe Products, Confident Consumers"

 जागतिक ग्राहक दिनानिमित्त विशेष लेख :

 

जागतिक ग्राहक हक्क दिन : "Safe Products, Confident Consumers"

 

दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक ग्राहक हक्क दिन हा दिवस ग्राहकांच्या अधिकारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. ग्राहकांना सुरक्षितदर्जेदार आणि पारदर्शक सेवा मिळाव्याततसेच त्यांच्या तक्रारींना न्याय मिळावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. महाराष्ट्रात अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमार्फत ग्राहक हक्कांबाबत जनजागृती केली जाते.

ग्राहकांना बाजारपेठेत खरेदी करताना अनेकदा चुकीची माहितीनिकृष्ट दर्जाची उत्पादने किंवा फसवणुकीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ग्राहकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी विविध अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांची जाणीव असणे हीच ग्राहकांसाठी सर्वात मोठी ताकद ठरते.

ग्राहकांना मिळालेले सहा मूलभूत हक्क

ग्राहक संरक्षण व्यवस्थेनुसार ग्राहकांना सहा महत्त्वाचे हक्क प्रदान करण्यात आले आहेत . हे हक्क बाजारपेठेतील पारदर्शकता आणि न्याय्य व्यवहार सुनिश्चित करतात.

१. सुरक्षिततेचा हक्क

ग्राहकांना अशा वस्तू व सेवांपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनाला किंवा संपत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.

२. माहिती मिळण्याचा हक्क

वस्तू किंवा सेवांची गुणवत्ताप्रमाणकिंमतघटकउत्पादनाची माहिती याबाबत ग्राहकांना संपूर्ण व अचूक माहिती मिळण्याचा अधिकार आहे.

३. निवडीचा हक्क

ग्राहकाला विविध पर्यायांमधून योग्य वस्तू किंवा सेवा निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. जबरदस्तीने विक्री किंवा अन्याय्य व्यापार पद्धतीला प्रतिबंध आहे.

४. ऐकून घेण्याचा हक्क

ग्राहकांच्या तक्रारी योग्य मंचावर मांडण्याचा आणि त्या ऐकून घेण्याचा अधिकार ग्राहकांना दिला आहे.

५. तक्रार निवारणाचा हक्क

निकृष्ट वस्तूचुकीची सेवा किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई मागण्याचा व न्याय मिळवण्याचा अधिकार आहे.

६. ग्राहक शिक्षणाचा हक्क

ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक असणे आणि फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi