Friday, 20 March 2026

बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क आणि परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय

 बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरशिवाजी पार्क आणि परिसरात स्वच्छतापिण्याचे पाणीफिरते शौचालय आणि आरोग्य पथकांची चोख व्यवस्था करून नागरी सुविधा पुरविण्यात यावे. मुंबई पोलिसांनी गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त तैनात करावा आणि सुरक्षा व्यवस्था पुरवावी. रेल्वे आणि एसटी महामंडळाने अनुयायांच्या प्रवासासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करावेजेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याचे नियोजन करून वाहतूक व्यवस्था करावीएमएमआरडीए आणि संबंधित विभागांनी मैदानातील व्यवस्थातात्पुरता निवारा आणि वीजपुरवठ्याची जबाबदारी वेळेत पूर्ण करावी. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या सोहळ्याचे व्यापक प्रसिद्धी नियोजन करावे असे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्यात व्यापक लोकसहभाग असतो. दरवर्षी प्रमाणे प्रशासनाने कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. शासकीय यंत्रणांनी सेवाभावी वृत्तीने काम करून अनुयायांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यातअसे निर्देशही मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi