Sunday, 15 March 2026

डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा व कौशल्य विकास,

 या उपक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. परिषद उपक्रमाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. परिषदेत सुमारे २,९०० प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यासाठी क्यूआर कोड आधारित प्रवेश, स्वतंत्र सत्र हॉल, हेल्पडेस्क, स्वयंसेवक आणि लाईव्ह स्क्रीनिंग यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच सुरक्षा, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, वाहतूक आणि निवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र समन्वय कक्षही कार्यरत असेल.

परिषदेतील प्रमुख विषयांमध्ये डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा व कौशल्य विकास, संशोधन आणि नवकल्पना, मेडिकल व वेलनेस पर्यटन, गुंतवणूक तसेच ग्रामीण व सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण या विषयांचा समावेश आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे.


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi