Thursday, 19 March 2026

भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

 भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

 

मुंबई, दि.१७ : नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व सहा मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या एका १७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

शिष्टमंडळामध्ये भारतीय नौदलवायुदल व स्थलसेनेतील ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी तसेच राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय रशियाओमानइंडोनेशियानायजेरियानेपाळ व टांझानिया या मित्र देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज येथील वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ सध्या मुंबई व पुणे येथे अभ्यास दौऱ्यावर आले आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi