Sunday, 15 March 2026

ग्राहकांचे मूलभूत अधिकार

 ग्राहकांचे मूलभूत अधिकार

ग्राहक चळवळीमुळे ग्राहकांना काही मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनीडी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर ग्राहक हक्कांविषयी ऐतिहासिक भाषण करत चार मूलभूत अधिकार मांडले. त्यात पुढील अधिकारांचा समावेश होता 

सुरक्षेचा अधिकार (Right to Safety) – धोकादायक वस्तू किंवा सेवांपासून संरक्षण, माहितीचा अधिकार (Right to be Informed) – वस्तूची गुणवत्ताप्रमाणकिंमत आणि दर्जा याबाबत अचूक माहिती मिळण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार (Right to Choose) – विविध पर्यायांमधून वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार, मते मांडण्याचा अधिकार (Right to be Heard) – ग्राहकांचे मत शासन आणि धोरण प्रक्रियेत ऐकले जाणे.

यानंतर संयुक्त राष्ट्रांनी १९८५ मध्ये ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारून ग्राहक शिक्षणतक्रार निवारणमूलभूत गरजांची पूर्तता आणि निरोगी पर्यावरणाचा अधिकार यांसारखे अतिरिक्त अधिकारही मान्य केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi