Wednesday, 18 March 2026

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी

 वाहतूक नियम भंगई-चलनद्वारेच दंड आकारणी

-         गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. १८ : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पारदर्शकता राखली जात असून ई-चलन प्रणालीद्वारेच ऑनलाइन दंड आकारला जात असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य निरंजन डावखरे यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.

गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले,  महानगरपालिकांनी पार्किंगसाठी जागा निश्चित केलेल्या असतात.  या ठिकाणी पार्किंग न करता चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस यांच्याकडून तत्काळ कारवाई केली जाते. या ठिकाणी वाहनमालक उपस्थित नसल्यास संबंधित वाहन टोइंगद्वारे उचलण्यात येते आणि नंतर नियमानुसार दंड आकारला जातो. मात्र कोणत्याही प्रकरणी अनधिकृत पद्धतीने दंडाची वसुली केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावेअसे आवाहन गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi