मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या दृष्टीने एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळण्यासाठी मोठ्या आणि नामांकित खाजगी रुग्णालयांनीही यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,
मुंबईसारख्या महानगरात उपलब्ध असलेल्या प्रगत वैद्यकीय सुविधेचा लाभ सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मिळण्यासाठी नामांकित खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सहज उपलब्ध होणे शक्य होईल. योजना अधिक प्रभावी राबवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, तसेच खाजगी व धर्मादाय रुग्णालयांनीही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.
No comments:
Post a Comment