Sunday, 15 March 2026

वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित पेंच वन्यजीव क्षेत्रातील ४० ठिकाणचे अलर्टस्‍ मिळणार

 वाघबिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित

पेंच वन्यजीव क्षेत्रातील ४० ठिकाणचे अलर्टस्‍ मिळणार

 

नागपूरदि. १३ : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासी बहुलक्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशित असलेले गाव. याच्या शेजारी पिपरिया नावाचे छोटेसे गाव. वाघांच्या डरकाळ्या व संचार या गावात तसा नवा नाही. वेळोवेळी पाळीव प्राण्यांसह या गावात माणसांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. यातून माणसाच्या जीवांना वाचविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलस व वन विभागाने अभिनव उपाययोजनांवर विचार सुरु केला. यातून एआय आधारित प्रकल्पाने आकार घेतला. याची फलश्रुती म्हणून तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून देवलापारजवळील पिपरिया येथे वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले.

विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi