Sunday, 15 March 2026

आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी सर्व कामे करू

 यावेळी श्री. चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले कीपत्रकारितेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून पूर्वी एखादी बातमी करण्यासाठी रिपोर्टरकॅमेरामनसहाय्यक आणि चालक अशी अनेकांची टीम लागायचीमात्र आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरणलेखनव्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी सर्व कामे करू शकतो. तंत्रज्ञानाची ही प्रगती थांबवता येणार नाहीत्यामुळे पत्रकारांनी एआय आणि नवीन साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. गुगलई-मेलसोशल मीडिया आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे संवाद आणि माहितीचा वेग प्रचंड वाढला असून भविष्यात एआयमुळे आणखी मोठे बदल घडणार आहेत. त्यामुळे अशा परिषदांमधून पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान चांगले की वाईट हे त्याच्या वापरावर अवलंबून असतेत्यामुळे एआयचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi