Tuesday, 24 March 2026

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी

  

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील

 कार्यवाही करावी

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

 

 मुंबई, दि. 23 : वारणा धरणग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शेतीयोग्य असणाऱ्या जमिनींचे लवकरात लवकर धरणग्रस्तांना वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावीअसे निर्देश सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

 

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्त यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री जाधव पाटील बोलत होते. बैठकीस आमदार जयंत पाटीलउपसचिव संजय इंगळेसांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोते यांच्यासह वारणा धरणग्रस्त आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारसांगली जिल्हाधिकारी अशोक काकडेसांगली उपवनसंरक्षक गवतेप्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi