Wednesday, 25 March 2026

मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

 मिशन लक्ष्यवेध अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता

 केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

 

मुंबई, दि.२४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिशन लक्ष्यवेध अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेल्या २५ वर्षाखालील खेळाडूंनी ३१ मार्च २०२६ पर्यंत https://forms.gle/2f7ypkikdUBKN7FA यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिले आहे.

 

या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षणआवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी घडवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंगलॉन टेनिसशूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ई-मेल : missionlakshvedhamumdiv@gmail.com यावर संपर्क साधावा.

 

तालुका क्रीडा संकुलकोपरीठाणे येथे ६ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराची निवड चाचणी होणार असूनअधिक माहितीसाठी हिमानी परब  ८३९१९६४०४६ यांना संपर्क साधावा. महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनकुपरेज क्लबमुंबई येथे ७ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता लॉन टेनिस क्रीडा प्रकारची निवड चाचणी होणार असून अधिक माहितीसाठी प्रीती टेमकर ९०२२२५०७५८ यांच्याशी संपर्क साधावा.  शूटिंग क्रीडा प्रकाराची निवड चाचणी  कामगार कल्याण मंडळदादरयेथे ०८ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वा. होणार असूनअधिक माहितीसाठी नेहा साखरे  ९८६९१९७०२२ यांना संपर्क साधावा.  टेबल टेनिस क्रीडा प्रकाराची निवड चाचणी नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळपनवेल येथे ०९ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वा होणार असूनश्री. नीलकंठ आवाडे  ९१६७३१७०८२ यांच्याशी संपर्क साधावा.

 

अर्जासोबत जन्मदाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रआधार कार्डक्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्रबोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi