Thursday, 19 March 2026

जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार

 जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·        जल प्रवासी वाहतुकीला गती

 

मुंबईदि.१ : "मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतूकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल"असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सुरू झाली. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेअपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह महाराष्ट्र सागरी मंडळाचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi