Sunday, 15 March 2026

सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत

 सुमारे दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त २ बीएचके स्वरुपातील सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा यासह  ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून भूकंप रोधक तंत्रज्ञानवर आधारित उभारलेल्या या इमारतींमध्ये दोन पॅसेंजर लिफ्ट, एक फायर लिफ्ट, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे.  या प्रकल्पांतर्गत ३ मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया आणि प्रशस्त जिने आहेत. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi