Friday, 27 March 2026

द एशियाटिक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार

 द एशियाटिक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार

-         राज्यमंत्री आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. २५ : द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेतनिवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, संस्थेच्या अध्यक्षउपाध्यक्षमानद सचिव आणि सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात यावर्षी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. विशेषतः मतदार यादी जाहीर न करणे आणि निवडणुकीपर्यंत सातत्याने नवीन नोंदणी सुरू ठेवणेया बाबींवर आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे आता नव्याने मतदार यादी जाहीर करून त्यावर आक्षेप मागविणेकट-ऑफ तारीख निश्चित करणे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi