Thursday, 19 March 2026

पिंपळनेर वीज केंद्राचे काम 2027 पूर्वी पूर्ण होईल

 पिंपळनेर वीज केंद्राचे काम 2027 पूर्वी पूर्ण होईल

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 18 : धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील 132 केव्ही वीज केंद्र प्रकल्पाचे काम 2027 पूर्वी पूर्ण करून उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर विजेच्या पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातीलअसेही त्यांनी सांगितले.

 

सदस्य मंजुळा गावित यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेपिंपळनेर प्रकल्पाला 22 जुलै 2024 रोजी प्रथम प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 20 मार्च 2025 रोजी एमएआरसीकडून मंजुरी मिळाली. प्रकल्पासाठी कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला असूननियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत.

 

या प्रकल्पामुळे परिसरातील वारंवार होणारे ट्रिपिंगव्होल्टेज फ्लक्चुएशन आणि लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. राज्यात सध्या वीज उपलब्धतेची कमतरता नसूनतांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात. पिंपळनेर येथे उभारण्यात येणारे हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर अशा समस्या उद्भवणार नाहीत. संबंधित मतदारसंघातील वीज समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पुढील सात दिवसांत महावितरण आणि महापारेषणचे अधीक्षक अभियंता यांची संयुक्त बैठक घेऊन स्थानिक प्रश्न निकाली काढले जातीलअसेही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi