Saturday, 20 December 2025

एपस्टीन फाईल वीर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या देशद्रोही वक्तव्यांमुळे

 एपस्टीन फाईल वीर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या देशद्रोही वक्तव्यांमुळे त्यांच्या विरुद्ध भाजपाचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी निषेध आंदोलन केले.


माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी करण्यात आलेली आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र निषेध करत जोडेमार आंदोलन केले.
पृथ्वीराज चव्हाण यांना जर वयाच्या ७८व्य वर्षी  यांना "एपस्टीन फाईल" आठवते म्हणजे त्यांना म्हातारचाळ लागले आहेत. असे मत आमदार भातखळकर यांनी व्यक्त केले.

भारतीय सैन्याचा अपमान करण्याचे काम सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले असून काँग्रेस नेतृत्वाचा लाळघोटेपणा करणे व प्रसिद्धीसाठी हे सगळे उद्योग करत आहेत असा आरोप आमदार भातखळकर यांनी या प्रसंगी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल जर माफी नाही मागितली तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला आम्ही दाखल करू, त्यांनी माफी न मागितल्यास त्यांचे तोंड काळे करण्याचे काम हात घेण्यात येईल असा असा तीव्र इशारा कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार भातखळकर यांनी केला.

या आंदोलनाला शकेडोच्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi