Saturday, 13 December 2025

राज्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही

 राज्यातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही

-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

नागपूरदि. १३ : राज्यात जेथे शाळा तेथे शिक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असून एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाहीअशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

 

सदस्य किरण सरनाईक यांनी अनेक शाळांमध्ये संचमान्यतेमुळे शिक्षक उपलब्ध होणार नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

 

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणालेसंच मान्यतेबाबतच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयावरील याचिका निकाली काढून उच्च न्यायालयाने हा शासन निर्णय वैध ठरवला आहे. सध्या राज्यात सुरू असलेली विकास कामेउपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा यामुळे दुर्गमडोंगरी किंवा नागरी भाग असा फरक राहिलेला नसून कोणतीही शाळा पटसंख्येअभावी शिक्षकाविना राहणार नाहीयाची दक्षता घेण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi