Monday, 29 December 2025

राज्यात रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट

 राज्यात रस्ता अपघातांतील मृत्युदरात घट

परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश

 

मुंबईदि २३ : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असूननोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्युदरात घट नोंदविण्यात आली आहे.

 

जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असूनत्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले होते. तुलनात्मक पाहताअपघातांची संख्या २१८ ने (०.६६ टक्के) वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. मृत्युदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दाखवते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi