Sunday, 28 December 2025

लोहगावासह ११ नवीन गावांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

 लोहगावासह ११ नवीन गावांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

मंत्री उदय सामंत

 

नागपूरदि. १२ : पुणे महापालिकेत लोहगावासह ११ नवीन गावांचा समावेश प्रस्तावित असलेल्या विकास आराखड्याची (डीपी) अंतिम प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसूनकायद्यानुसार सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम डीपी जाहीर करण्यात येईलअशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 

सदस्य बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले कीसंबंधित डीपीचा मसुदा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून ६० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया होणार आहे.

 

मंत्री सामंत म्हणाले कीरस्त्यांची आरक्षणेघरांवर पडलेली आरक्षणेकाही बिल्डरांच्या जमिनी वगळणे आदी सर्व तक्रारी आणि हरकती सुनावणीत विचारात घेतल्या जातील. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाहीही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. सुनावणी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीपी जाहीर केला जाणार नाही. शेतकरीनागरिकभागधारक यांनी केलेल्या हरकती, सूचना विचारात घेवूनच डीपी अंतिम करण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi