Monday, 8 December 2025

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

 लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद

·         १८ विधेयके मांडली जाणार

 

नागपूरदि. ७ : मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेलअसा विश्वास व्यक्त केला.

 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसंसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलइतर मागासवर्गबहुजन कल्याण मंत्री अतुल सावेपर्यटन मंत्री शंभूराज देसाईमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकवित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्व निकषांत अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सुमारे ९२ टक्के म्हणजेच ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल. अतिरिक्त १० हजार रुपयांची मदत तसेच खरडून गेलेल्या जमिनीविहिरी आदींसाठी स्वतंत्र मदत दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनात दररोज १० तासांहून अधिक कामकाज करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. या अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार असून विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित अधिकाधिक प्रश्नांवर चर्चा होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दावोससह विविध मंचांवर झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात येत असून  हे उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi