Saturday, 13 December 2025

देशामध्ये द्वि सभागृह पद्धत अत्यंत महत्त्वाची

 राज्याच्या विकासात सभागृहाचे उत्तुंग योगदान


- विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे


देशामध्ये द्वि सभागृह पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. प्रभावी कायदे निर्मिती यामुळे शक्य झाली आहे. राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणल्यानंतर निर्मित होणारे कायदे तसेच ध्येयधोरणे राज्याच्या विकासासाठी पोषक ठरतात. राज्याच्या विकासामध्ये विधान परिषद सभागृहाचे उत्तुंग योगदान आहे, अशा शब्दात सभागृहाचे महत्त्व विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी अधोरेखित केले.

 निर्दोष कायदे बनवण्यासाठी द्वि सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. या वरिष्ठ सभागृहातील अनुभव संपन्न सदस्यांकडून झालेल्या चर्चेअंती निर्मिती कायदा हा अत्यंत प्रभावशाली ठरतो. कायदे निर्मितीची प्रक्रिया अधिकाधिक निर्दोष करण्याची जबाबदारी वरिष्ठ सभागृहावर आहे. त्यामुळे कायदा निर्मिती प्रक्रियेत येथे झालेली चर्चा ही ऐतिहासिक ठरत असल्याचेही सभापती प्रा. शिंदे यांनी प्रतिपादित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi