Saturday, 13 December 2025

सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षकेतर कामे देण्याबाबत

 सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षकेतर कामे देण्याबाबत

 कौशल्य विकास मंत्र्यांसमवेत बैठक

-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

नागपूरदि. १३ : राज्यात शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे देण्यात येऊ नयेतअशी मागणी वारंवार होत असते. सुशिक्षित बेरोजगार युवकांना अशी कामे देता येतील का याबाबत कौशल्य विकास मंत्री यांच्यासमवेत बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात येईलअसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

 

राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी याबाबत अधिक माहिती देताना शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे देण्यात येऊ नयेत याबाबत इतर विभागांच्या प्रधान सचिवांना निर्देश देण्यात येतीलअसे सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi