Tuesday, 9 December 2025

स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या कामकाजाचे ऑडिट होणार

 स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या कामकाजाचे ऑडिट होणार

– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ

 

नागपूरदि 9 : दत्तक वस्ती योजनेच्या जागी 2013 पासून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती स्वच्छता योजनेचे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

          विधानसभा सदस्य तुकाराम कातेअमीन पटेलअमित साटमप्रकाश सुर्वे या सदस्यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

          नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले कीस्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजनेची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2013 पासून संपूर्ण मुंबई शहरात करण्यात आली होती . या योजनेनुसार 200 घरांमागे एक युनिट तयार करण्यात आले आणि त्या प्रत्येक युनिटसाठी महापालिकेकडून प्रती महिना 5,400 रुपयेतसेच प्रबोधनासाठी 600 रुपयेअसे एकूण 6,000 रुपये अनुदान देण्यात येते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi