Thursday, 16 October 2025

आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ

 आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ

 

मुंबईदि १५ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छतासुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य भवन येथे यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

 

या उपक्रमामुळे राज्यातील २० जिल्हा रुग्णालयेआठ सामान्य रुग्णालये१०५ उपजिल्हा रुग्णालये३७८ ग्रामीण रुग्णालये२२ महिला रुग्णालये आणि ६० ट्रॉमा केअर युनिट्स अशा राज्यातील एकूण ५९३ आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेद्वारे रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावली जाणार आहे. या सर्व संस्थांमध्ये २९,३१५ खाटांची क्षमता आहे.

 

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीराज्यात आरोग्य सेवांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असून आता यांत्रिकी वस्त्र धुलाई सेवेच्या शुभारंभामुळे रुग्णालयांमधील स्वच्छताशिस्त आणि रुग्णसेवेचा दर्जा आणखी उंचावेल. महाराष्ट्रात सुरू झालेली यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा देशासाठी पथदर्शी ठरेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi