Thursday, 16 October 2025

पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता

 योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता व जबाबदारीच्या स्पष्टतेसाठी विविध समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्याचे स्वरूप शासन निर्णय नुसार निश्चित करण्यात येईलअसे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

              रोजगार हमी योजना मंत्री गोगावले म्हणालेगाव पातळीवर याची अंमलबजावणी सुरू होत आहे. या अनुषंगाने शेत व पाणंद रस्त्याची कामे गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

              राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणालेबळीराजा शेत व पाणंद रस्ते मोहिमेत देखील चांगले काम करण्यात यावे. यादृष्टीने अभ्यापूर्ण तरतुदी करण्यात येत आहे.

               बैठकीमध्ये उपस्थित सदस्य आमदारांनी चर्चेत सहभाग घेऊन बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणी व कार्यवाहीसाठी विविध मुद्दे मांडले. तांत्रिक व कार्यकारी यंत्रणेच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अभ्यास गटाने तयार केलेल्या आराखडयावर यावेळी चर्चा करण्यात आली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi