Thursday, 16 October 2025

दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत

 दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अन्न व  औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात 'सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची सतर्कताया विषयावर अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार 21बुधवार22आणि गुरूवार 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सतत कार्यरत असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत अन्नसुरक्षेच्या विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. सणांच्या काळात मिठाईनमकीनतेलदूधपेय पदार्थमसाले आदी खाद्यपदार्थांची मागणी वाढत असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली असूनराज्यभरातील मिठाई तयार करणाऱ्या व विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अन्न नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. गुणवत्ताहीनकालबाह्य किंवा भेसळ केलेले पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर औषध विक्री केंद्रेघाऊक वितरक तसेच ऑनलाईन विक्री करण्याऱ्यांवर देखरेख ठेवली जात आहे. नकलीकालबाह्य किंवा परवानगीशिवाय विक्री होणाऱ्या औषधांसंदर्भात कठोर पावले उचलली जात आहेत. राज्यभर स्वच्छ व सुरक्षित अन्न आपली जबाबदारी’ जनजागृती उपक्रमही राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi