Monday, 27 October 2025

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त महाराष्ट्र सदन येथे भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त महाराष्ट्र सदन  येथे भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा

·        राज्यपालमुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन

 

नवी दिल्ली, दि. 27 : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जुने महाराष्ट्र सदन येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.

 

याप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमलानिवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाडसहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेस्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र.उपसंचालक मनिषा पिंगळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. देशाच्या आर्थिकसामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi